Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग ११४-आत्मदर्शन हाच तिच्या क्षयाचा उपाय आहे, असे सागून या सर्गात विशुद्ध आत्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, देवाचा लहानसा बिंदु सूर्याचे दर्शन होतांच जसा नाहिंसा होतो त्याप्रमाणे आत्म्याच्या दर्शनाबरोबर ही अविद्या नाहीशी होते. आत्मदर्शनाची इच्छा होई तोच अविद्या देहाभिमान्ने अहंकारा( जीवा )स संसाररूपी झोपाळ्यावर बसवून आपल्या बरोबरच त्यासही झोंके खावयास लाविते. पण तिने परमात्म्यास पाहिले की, तिचे आयुष्य संपले. ह्मणजे कडकडीत उन्हाचा अनुभव घेण्याची इच्छा करणान्या छायेप्रमाणेच हिची दशा होते इच्छा ही कार्याविद्या व आत्मदर्शनाने जिचा नाश होतो ह्मणून झटले आहे ती कारणाविद्या आहे. इच्छारूपी कायोविद्येचा नाश होणे हाच मोक्ष व तो केवल असंकल्पानेच सिद्ध होतो. मनोरूपी आकाशातील वासनारूपी गत्र क्षीण झाली असता व ज्ञानरूपी सूर्य उगवला असता अविद्या-आवरण-रूपी अधकार पार नाहीसा होतो. सूर्योदयानतर रात्र जशी कोठे पळून जाने त्याप्रमाणे विवेकोदयानतर अविद्या कोठे तरी जाऊन लपते. बालकाच्य भूताविषयींच्या कल्पनेप्रमाणे दृढ वासनेमुळे चित्ताचा बंध दृढ होतो. श्रीराम-ब्राह्मणवर्य, आपणास जेवढे ह्मणून हे काही दिसत आहे त. सर्व अविद्या आहे व तिचा आत्मभावनेनें क्षय होतो, असे आपण सागि- तलेत, ते मी समजलो. आता त्या आत्म्याचे स्वरूप कसे आहे ते मला सागा. श्रीवसिष्ठ-विषयरहित, विक्षेप-आवरण-शुन्य व अनिर्वचनीय असे जे चित्-तत्त्व तोच आत्मा व परमेश्वर आहे. तृणकाष्ठापासून आब्रह्मस्तभ- पर्यत जे हे जगत् तें सर्वही सर्वदा आत्माच आहे. अविद्या नव्हे. हे सर्व नित्य अखड व चिप ब्रह्म आहे. मन ह्मणून निराळी कल्पना नाहीच. या त्रिभुवनात काही मरत नाही व काही उत्पन्न होत नाही. तर केवळ चिन्मात्रसत्ता आहे. पण शात निर्विकार व स्वयप्रकाश आत्म्याचे ठायीं चैतन्यादि स्वभावाच्या विरुद्ध जाड्य, मर्यादितपणा इत्यादिकाची कल्पना करून धावणारी जी विक्षेपशक्ति तेच मन होय. या सर्वगामी व सर्वश- क्तिमान् मनो-देवापासून, पाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या लहरीप्रमाणे, पदार्थाचा विभाग करणारी शक्ति उत्पन्न होते. केवल संकल्पानेच ती