पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११३. थै१६७ सत्त्वगुणाच्या योगाने ती ज्वालेप्रमाणे शुद्धवर्ण असली तरी तिचा अतर्भाग तमोगुणामुळे शाईप्रमाणे काळा असतो. आत्म्याच्या सानिध्याने ती चल होते व त्याचा साक्षात्कार झाला असता स्वतः नाश पावते. आत्मप्रका- शामध्ये ती म्लान दिसते व अज्ञान-अधकारात विराजमान होते (चमकते. शोभते ) ही ससारारभचक्रिका अनेक सकटास कारण होते, ह्मणूनच ती कर्कशा आहे. तरुण व सुदर स्त्रीप्रमाणे चचल आहे व लाभी तृष्णाही तीच आहे. स्नेहाचा क्षय होताच दीपशिखेप्रमाणे ती तात्काल क्षीण होते व स्नेहावाचूनच शेदुराच्या रेधेप्रमाणे आपोआप शोभायमान होते. ही अविवेक्यास भयभीत करिते. हिचे विस्मरण होणेच अतिशय श्रेयस्कर आहे. कारण वारवार स्मरण करू लागल्यास ती अनर्थात पडल्यावाचून रहात नाही. आत्म्याच्या मानिध्यामुळेच ही आपली काय करू शकते. पापामध्ये हिची वाढ फार होते. विषयुक्त मोदकाप्रमाणे ती आरंभी अतिशय गोड व परिणामी अतिशय दारुण होते. ती नष्ट झाली ह्मणजे दिव्याच्या नष्ट झालेल्या ज्योतीप्रमाणे कोठे जाते काही समजत नाही. हिने चित्तास व्यापून सोडले ह्मणजे लोक ससाररूपी दीर्घ स्वप्न पाहू लागतात सर्व भ्रम हिन्यामुळेच होतात. ही करीत नाही असे काहीच नाही. राघवा, अकिचन अशाही तिची ही केवढी शक्ति आहे ते पहा. तस्मात् विवेकबुद्धीने विषयबुद्धीचा निरोध करावा. प्रवाहाचा निरोध केला असता खालची नदी जशी शुष्क होते त्याप्रमाणे निराधाच्या योगाने मनोनदीही क्षीण होते. श्रीराम-प्रभो, आपण हा मला मोठाच चमत्कार सागितलात. असत् , कोमल, तुच्छ, मिथ्याभावना करणारी, नीरूप, निराकार, चेतन- हीन, असत्य असूनही नाश न पावणारी, प्रकाशास भिणारी व अंधकारात स्फुरण पावणारी, नियमार्ने कुकर्मच करणारी, ज्ञानास सहन न करणारी.. देहासही न जाणणारी, काम, क्रोध इत्यादिकानी युक्त असलेली, जड व अंधरूप अशा या वासनामय अविद्येने जगास अध करून सोडले आहे. हा मोठाच चमत्कार होय. ही पुरुषाची प्रतिकूल भार्या आहे. त्यास पाहावे, असे तिला वाटत नाही. पण तिने त्याला अध करून सोडि आहे. तर भाता, गुरुराज, हिचा निरोध कसा होईल ते सांगा १११.