पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ बृहद्योगवासिष्ठसार. आवश्यकता असते. अथवा बा माझ्या प्रिय शिष्या, मी अकर्ता आहे, असाही अभिमान तू धरूं नकोस. कारण तसा अभिमान धरून तरी तुला काय करावयाचे आहे ? कारण आपल्या प्रयत्नाने प्राप्त करून घेण्या- सारिखें तुला काहीच नाही. यास्तव तू स्वस्थ हो. मी अकर्ता आहे, असा अभिमान धरिल्यासही तू त्या अभिमानाचा कर्ता होशील, हे विसरू नको. हे सर्व विश्वच जर इद्रजालाप्रमाणे मायामय व असत् आहे तर त्यात आस्था काय ठेवावयाची आहे ? व त्यातील कोणास त्याज्य व ग्राह्य समजावयाचे ? रामा, ही अविद्याच ससारबीजकणिका आहे. वस्तुतः ती मिथ्या असूनही सत्य वाटते. ह्मणून आह्मी विश्वास इद्रजाल ह्मणतों. अविद्याच ससारास आरभ करणारी चक्रिका आहे. तीच चित्तास मोहित करणारी वासना आहे. वेळूचा वासा जसा वरून दिसावयास फार मोठा व बळकट. पण आत पोकळ त्याप्रमाणे ही अविद्या निःसार माहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ही अविच्छिन्न जरी आहे तरी तिचा आत्म- ज्ञानानेही नाश होत नाही, असें नाही. हिच्या प्रत्येक कार्याशी आपण व्यवहार करीत असतो. पण तिचे ग्रहण करितां येत नाही. ह्मणजे ती प्रत्यक्ष दिसत नाही. ओव्याच्या लाटांप्रमाणे ती अति मृदु असली तरी तीरावरील वृक्षादिकास पाडणान्या त्या लाटाच्या अप्राप्रमाणे अति तीक्ष्ण आहे ती कार्य करण्यास समर्थ असलेल्या कारणसमूहाप्रमाणे दिसते खरी; पण एकही सत्य पुरुषार्थ तिच्या हातून होत नाही ती एकप्रकारची नदी आहे हे खरे; पण स्नानपानादि कार्याच्या निरुपयोगी असलेल्या मगजलाची नदी आहे. अथवा स्वप्नातील स्नानादिकाच्या उपयोगी असलेली स्वमगत नदी आहे. ती केवल दिसण्यास मोठी सुंदर; पण एकही सत्य कार्य न करणारी आहे. कोठे वक्र, कोठे सरल, कोठे दीर्घ, कोठे -हस्व (आखुड), कोठें स्थिर, कोठे चल असे तिचे अनेक आकार आहेत. ती ज्याच्या प्रसादानें उत्पन्न झाली त्याच्यापासूनच वेगळी होऊन रहाते. तिच्या अतर्भागी सौदर्य मुळीच नाही; पण बाहेरून ती फार सुदर दिसते. वस्तुतः ती कोठेही नसते. पण सर्वत्र अनुभवास येते. ती ससार-आरंभ- चक्रिका खरोखर जड आहे. परतु चैतन्ययुक्त असल्याचा भास होतो. मनाच्या चांचल्यावर आपला निर्वाह करण्याचे तिचे शील आहे. ती एक क्षणभरही स्थिर नसते. पण मी स्थिर आहे, अशी श्रोति पारते.