पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ११३. टाकून दे. ( मी निराळा, हे इतर प्राणी निराळे व जगातील प्रत्येक पदार्थ निरनिराळा, असे समजणे हीच भेदवासना होय.) त्यानंतर संकल्प- पूर्वक चित्त व चित्ताचे विषय याच्या वासनेचा त्याग कर. शेवटीं अज्ञान राहिले. पण तत्वसाक्षात्काराच्या योगाने अविद्या-आवरणाचाही त्याग करून तू सुखी हो. हाच वासनाक्षय व मनोनाश होय. अविद्यानाश यालाच ह्मणतात चित्ताच्या द्वारा साक्षीस ज्याचे ज्याचे ज्ञान होते ते ते दुःखदायक असतें यास्तव चित्ताचा क्षय झाल्याकारणाने कोणत्याही (बाह्य किंवा आतर) ज्ञेयाचे ज्ञान न होणे व त्यामुळे स्वयंप्रकाश आत्म्याचा साक्षात् अनुभव येणे, हेच निर्वाण होय. पुरुषाच्या प्रयत्नानेच तें लाभते. पदार्थाची भावना न करणे हा फार मोठा अभ्यास आहे. त्याच्यापासून निरतिशय कल्याण होत असते. यास्तव, बा प्रिय रामचद्रा, तुझ्या मनामध्ये मिथ्या रागादि जे दोष असतील त्यास अगोदर पूर्णपणे ओळखून त्याचा त्याग कर, नतर ते रागादि हेच ज्याचे अकुर आहेत अशा मनःसज्ञक त्याच्या बीजाचा अज्ञान व वासना यासह त्याग कर. आणि हर्ष-शोक मानू नकोस. ह्मणजे तू अत्यत तृप्त होशील ११२. सर्ग ११३-सर्व दुर्वासनांचा उच्छेद करणाऱ्या, विविध विचारानी युक्त मस- लेल्या व द्वैत मिथ्या आहे, या बुद्धीने रूढ होणाऱ्या तत्त्वबोधाचे वर्मन येथे करितात. श्रीवसिष्ठ-ज्याअर्थी ही वासना असत्यच उत्पन झाली आहे त्याअर्थी तिचा त्याग करिता येणे शक्य आहे. विवेकविज्ञानशून्य पुरुषाचे ठायीं अविद्या अत्यत दृढ व सत्य होऊन रहाते. पण विवेकी पुरुषांचे ठायीं तिला थारा मिळत नाही. यास्तव राघवा, तू अज्ञ होऊ नकोस. प्राज्ञ हो. चागला विचार कर. आकाशात एकच चद्र असताना भ्रातीने दोन दिसतात. त्याप्रमाणे एकच तत्त्व असताना द्वैताचा अनुभव भ्रातीने येतो. या सृष्टीत परमात्म्यावाचून कोणतीही वस्तु नाही. यास्तव नित्य, बंधराहत, सर्वव्यापी व शुद्ध आत्म्याच ठायीं कशाचाही आरोप करूं नकोस. तू कर्ता नाहीस. मग तुझी या क्रियामध्ये ममता का ? एकच अद्वितीय वस्तु कोणतें कार्य कोणत्या साधनानें कसे करणार ? क्रिया एकच कारकाने साध्य होत नसते. तर तिला कर्ता, कर्म, करण, सप्रदान, अपादान व अधिकरण या सहा कारकांतील निदान दोन कारकाची तरी ३०