पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ-अग्रीच्या उष्णतेप्रमाणे मनाचे चाचल्य स्वाभाविक भाहे. जगाचे कारण अशी जी माया तिने युक्त असलेल्या चैतन्यामध्ये अस- लेली जी ही क्रियाशक्ति तीच मानसी शक्ति आहे. स्पदावाचून वायूचे अस्तित्व कळत नाही. त्याप्रमाणे चाचल्यावाचून मनाचे अस्तित्त्व अनु- भवास येत नाही. चचलतारहित मन झणजे मृत मनच होय आणि मत मन हाच शास्त्राचा सिद्धात किवा मोक्ष होय. केवल मनाच्या विलया- नेच दुःखाची शाति होते. विक्षिप्त चित्त हाच महाराक्षस दुःख देत असतो. यास्तव नित्य व निरतिशय सुख भोगण्याकरिता दीर्घ प्रयत्नाने त्याचा नाश कर. विचाराच्या योगाने त्याचा नाश करिता येतो सत्व असत् किंवा चित् व जड याच्या मध्यभागी राहून जे त्या दोघास जोडते ते मन होय. बाड्याच्या दीर्घ व दृढ अनुसधानाने चित्तही जडासारखेच भासू लागते. पण तेच, त्याला आत्मानुसधान करावयास लावून दीर्घ काल विवेकाभ्यास केल्यास दृढ अभ्यासामुळे ते चैतन्यरूप होते. पौरुप प्रयत्नाने मनास ज्याच्यामध्ये लावावे तद्रूप ते होते, असा अबाधित नियम आहे. यास्तव धैर्य व निश्चय करून अगोदर चित्तास आपल्या अवीन करून घे. नतर त्यास परमात्म्यामध्ये योजून तू निःशकपणे स्थिर हो. रामचद्रा, ससार- भावनेंत बुडून गेलेल्या मनाम विवेकयुक्त मनानेच जर वर काढिले नाही, तर तें वर कसे येणार ? मनाचा दृट निग्रह करण्यास मनच समर्थ आहे. राजाचा निग्रह बलाढ्य राजावाचून दुसरा कोण करणार ? ससार-समुद्रातील तृष्णारूपी मकर ज्यास दूर ओढून नेत आहेत त्या चचल मनास सुरक्षितपणे पलीकडे पोचविण्यास शुद्ध मन हीच एक दृढ नौका आहे. मन हाच दृढ पाश अथवा बधन आहे. त्याला विवेकयुक्त बुद्धीने तोडिले किवा सोडविले पाहिजे व हे कठिण कृत्य ज्याचे त्यालाच करणे उचित व अवश्य आहे. ते दुसऱ्या कोणाकडूनही होणे शक्य नाही. बाह्य विषयाविषयी मनःसज्ञक जी जी वासना उत्पन्न होईल तिचा प्रयत्नाने परित्याग करावा. सर्व बाह्य पदार्थ मिथ्या आहेत, असें अनुसधान केल्याने वासनात्याग सहज सिद्ध होतो व औष्ण्याचा क्षय झाला असता अग्नि जसा शात होतो त्याप्रमाणे वासनाक्षय झाला बसता मनासह अविद्या क्षीण होते. आता वासनात्यागाचा क्रम सागों. तू अगोदर अनेक भोगाविषयींची वासना सोड. नतर भेदवासना