पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ बृहद्योगवासिष्ठसार. सामध्ये ) गढून गेलेल्या चित्तास चिदात्म्यात मिळवून सोडावे. आपल्या स्वाधीन असलेले व निश्चयाने हित करणारे वैराग्य ज्यास दुष्कर वाटते त्या नराधमास धिक्कार असो. अरम्य असलेल्या सर्व विषयाची परमार्थतः रम्य असलेल्या ब्रह्मरूपाने भावना केली असता चित्तजय अगदी सुलभ होतो. ह्मणजे एकादा मल्ल, बालकास जसा सहज जिकितो त्याप्रमाणे पुरुष त्या भावनेमुळे चित्तास अनायासें जिंकू शकतो. यास्तव चित्तना- शाकरता प्रयत्न करून ब्रह्मरूप व्हावें. चित्तनिग्रह हाच परम पुरुषार्थाचा उपाय आहे. पण तो ज्याना असाध्य वाटतो त्यास धिक्कार असो. मन.- प्रशातीवाचून दुसरी शुभ गति नाही व ती (शाति ) पुरुषाच्या प्रयत्ना- नेच साध्य होते. मनःशाति जर नाही तर गुरूपदेश, शास्त्रपरिचय, कर्मानुष्ठान इत्यादि सर्व युक्ति तृणतुल्य आहेत. असकल्पनरूप शस्त्राने तोडलेले चित्त शात ब्रह्मच होते. राघवा, दैवाचा पूर्णपणे अनादर करून स्वपौरुषाने तू चित्तास अचित्त कर. चित्तास चिदात्म्याच्या तोडी देऊन त्याच्याकडून त्यास खाववून तू चित्ताच्या पलीकडचा स्वतः परमात्मा हो. प्रथम चिन्मात्र भावना कर. पण ती भावना स्थिर व्हावी ह्मणून त्यापूर्वी तू सावधान बुद्धीने युक्त हो. असे केल्याने चित्त आत्ममय होईल. नंतर अव्यग्र मनाने तू आत्म्याचा साक्षात्कार करून घे. चित्तनिग्रहास फार काल लागतो. पण उद्विग्न होऊन अभ्यास सोडू नये. कारण अनुद्वग हेच सर्व सपत्तीचे मूळ आहे. जो मनास जिकतो त्यास त्रैलाक्याचा विजय तृणासारखा तुच्छ वाटतो. या विजयात शस्त्रास्त्राचा उपयोग करून छिन्न भिन्न व्हावे लागत नाही. तर केवल चित्ताचा स्वभाव बंदलावयाचा असतो. चित्ताच्या प्रवृत्तीसही जे आळा घालू शकत नाहीत ते सर्व पुरुषा- र्थाविषयीं अयोग्य व असमर्थ भाहेत. मोक्षापर्यंत, अस्थिर मन इहलोक, परलोक, जन्म-मरण, सुखदुःख इत्यादिकात गुतलेले असते. माझा भ्राता मरण पावला, माझा उपयोगी बैल गेला, माझे धन चोरानी लुटले, माझी स्त्री मरणोन्मुख झाली इत्यादि-प्रकारचे क्लेशही चित्तधर्मच होत. आत्मधर्म नव्हेत. यास्तव सच्चिदानदरूप आत्म्यामध्ये मनास समूल मिळवून सोडणे यावाचून चित्तनाशाचा दुसरा उपाय नाही व चित्तनाशावाचून आत्मसाक्षात्कार होणे नाही. केवल मनाचा लय झाल्यानेच विश्राति उत्पन्न होते. बा रामा, या आपल्या मनास क्रूरपणे मार. निःशकपणे