पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ बृहद्योगवासिष्ठसार. पाळी येईल, अशा मनोरथांमध्ये व तदनुरूप कर्मामध्येच मनुष्याचा काळ जातो. स्त्री व इतर जन याचे मनोरंजन करण्यांतच आयुष्य सपते. वृक्षास पाने येतात व काही दिवसानी ती पिकून गळून पडतात. त्याच- प्रमाणे आत्मविवेकशून्य प्राणी जन्म घेतात व काही कालाने फुकट मरून जातात. सर्व दिवस इकडून तिकडून फिरून सायकाळी पुरुप धरी येतो व विवेकी लोकाचा समागम व सत्कर्म यांचा गधही लावून न घेता, निजून आयुष्याचा प्रत्येक दिवस घालवितो. शत्रंचा नाश करून आणि संपत्ति व इतर सुखसाधने मिळवून आता मुखोपभोग घ्यावा, असे जो तो ह्मणत आहे तोच काळ त्यास उचलून नेतो तात्पर्य जीवाला कष्ट देऊन द्रव्यादि पदार्थ जरी मिळविले तरी त्याचा उपभोग घ्यावयास मिटन नाही. मृत्यूच्या तोडातील भक्कम घाम होण्याकरिताच प्राणी शरीराम पोशीत असतो हे सर्व पुत्रामित्रादि प्राणी कोठन तरी येतात, कोठे तरी जातात, काही तरी करितात व काही तरी होते मनुष्याचा एकही नियम चालत नाही. ससारात निर्दीप दृष्टि कोठे आहे ? दु खरहित स्थल कोठे आहे? शाश्वत वस्तु कोठे आहे ? व कपटरहित कर्म कोणते आहे ४ साराश कितीही जरी विचार केला, तरी या सृष्टीत पाच भूताचाच सर्व प्रपच आढळतो. हे जग विकारमय आहे, हे असत्य आहे व यात सर्वत्र दुःख भरले आहे. ऐहिक भोगाचा काहीसा चमत्कार आहे, हे ग्वरे, पण त्या चम- त्काराच्या मागे लागल्यास आत्म्याचे भानही नाहीसे होते. कड्यावर किंवा विहिरीच्या काटावर उगवलेले हिरवे गवत पाहून लोभाने ते खाण्या- करिता पुढे गेलेला पशु जसा त्या कड्यावरून किवा विहिरीच्या काटा- वरून खाली पडून मरतो, तशीच या विषयासक्त लोभी पुरुपाची स्थिति होते. धार्मिक जन कोठे कोठे आढळतात. त्याचा अगदीच अभाव नसतो. पण विवेकी जन प्रायः दुर्लभ असतात. कारण परिणामी भयकर असलेली कमें प्रत्यही करविणाऱ्या या जड दैवाने सर्व प्राण्याची दुर्दशा करून सोडली आहे. हर ! हर ! केवढा चमत्कार हा !! २७. सर्ग २८-३१-येथे सर्व भोग्य पदार्थाविषयी वैराग्य उत्पन्न व्हावें झणून सर्व पदार्थ भ्रामक आहेत, असे वर्णन करून सर्व पदार्थामध्ये दोष आहेत. असें जाणूनच मी त्याविषयी विरक्त शालों आहे. यास्तव मला आता शाति प्राप्त होईल असा उपदेश करा; अशी प्रार्थना केल्यावर 'रामाने आनदपदप्राप्तीचा उपाय विचारिला आहे.