पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १११. ११ सुखदुःखही देशकालवशात् विरल अथवा घन होते. तिळांस घाण्यांत घालून चिरडलें असता तेल व्यक्त होते त्याप्रमाणे चित्तास मननाने चिर- डले असता सुखदुःख घन होते. देश व काल झणजे सकल्पच होय. कारण त्याच्यामुळेच ते अस्तित्वात आले आहेत. शरीरही मनःसकल्पाच्या अधीन असते. सकल्पाप्रमाणे ते नाचणे, उडणे, लोळणे, पळणे इत्यादि क्रिया कारते. यास्तव जो पुरुष आपल्या मनास आतल्या आत पसरूं देत नाही त्याचे मन त्याच्या अधीन होते. विषयाचे स्मरण करणे हेच मनाचे पसरणे होय. ज्याचे मन चचल होत नाही तोच उत्तम पुरुष होय. बाकीचे सर्व चिखलातील किडे आहेत. ज्याचे मन निश्चल होऊन एक आत्मवस्तूमध्ये एकाग्र होऊन रहातें तो पुरुष ध्यानाच्या योगाने ब्रह्मभूतच झाला आहे, असे समजावे मनाचे नियमन केले असता ससा- रभ्रम शात होतो. विषयोपभोगाविषयींचे मानसिक सकल्प हीच ससा- रविषवृक्षाची बीजे आहेत ११०. सर्ग १११-या सर्गात अहता, ममता, व इष्ट वस्तु याचा त्याग व ऐकाग्र्य है चित्त जयाचे उपाय आहेत, असे सागतात । श्रीवसिष्ठ--राघवा, आता मी चित्तव्याधीचे महा-औषध तुला सागतो. ते प्रत्येक पुरुषाच्या स्वाधीन असून पुरुषार्थ अवश्य साधून देणारे आहे. चित्त हा एक मोठा वेताळ आहे. न्यास मोठ्या यत्नाने जिकावे लागते. अत्यत इष्ट वाटणाऱ्या बाह्य विषयाचा त्याग करून केवळ आत्माकार चित्तवृत्ति, पाण्याच्या ओघाप्रमाणे अविच्छिन्न करणे, हाच प्रयत्न होय. ज्याने इष्ट वस्तूवरील प्रेम अगदी कमी केले आहे त्याचे रागादि सर्व चित्तरोग शात झाले आहेत, असे समजावें. चित्त हे एक रोगी पोर आहे, असे समजून सतत आत्माकार- तिरूप उपचाराने त्याचे आरोग्य राखावे. त्यास अनात्मवस्तूपासून परत फिरवून आत्मवस्तूकडे वळवावे व पुनः त्याच्या सगतीस लागू नकोस, असा बोध करावा. शास्त्र व सत्सग याच्या योगानें धीर झालेल्या व चिंतेचा त्याग केल्यामुळे शात बनलेल्या मनानेच विक्षिप्त चित्तास तोडावे. लाड, भीति इत्यादि उपायानी बालकास जसें चागल्या कामांत प्रवृत्त करता येते त्याचप्रमाणे चित्तासही तसल्याच उपायानी चांगल्या मार्गात सोडितां येते. परिणामी परम फल देणान्या सत्कर्मामध्ये ( समाधि-अभ्या-