पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ११०. ४५९ होतो व अशुभ मनोवृत्तीने तो दुःखी होतो, असा नियम आहे. मन स्वाधीन झाले की, सर्व इद्रिये स्वाधीन होतात. रामा, मनाच्या या विप- रीत कल्पनासामर्थ्याविषयी आणखी अधिक काय सागू ? पण ते, सर्वत्र सम, निर्विकार, स्वच्छ, सूक्ष्म, साक्षिभूत, चिन्मात्रस्वभाव व सर्व विक्रिया- रहित अशा ब्रह्मास स्वकल्पनेने देहाप्रमाणे जड बनवून (देहाशी त्याचे तादात्म्य करून) काम, सकल्प इत्यादि अतर्घातीने व पर्वत, नद्या, आकाश, समुद्र, नगरे इत्यादि बाह्य लीलेने त्यास बद्ध करिते. आतां तू कदाचित् ह्मणशील की, मूढ जन जरी अशी विपरीत कल्पना करीत असले तरी विचारजागरूक मन तशी अन्यथा कल्पना करणार नाही. पण ते युक्त नव्हे. कारण विवेकजागरूक मनही स्त्रीच्या मधुर नसलेल्या व उष्टया अधरोष्ठादि वस्तूस आपल्या अभिलाषामुळे अमृताप्रमाणे मधुर व पवित्र करितें व अभिलाषान्या अभावी ते अमृतासही विषासारखें त्याज्य समजते. विरक्त पुरुष अमृतासही त्याज्य समजतात, हे प्रसिद्ध आहे. तस्मात् केवल विवेकयुक्त मन काही उपयोगाचे नाही. सर्वात्म- भावाचा साक्षात्कार होईतो लौकिक विद्वानाचेही मन आपणास अभिमत असलेला आकार अवश्य निर्माण करील तत्त्ववेत्त्याच्या मनाची स्थिति मात्र याहून निराळी आहे. आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळे त्यास मनाचे सर्व विलास मिथ्या वाटतात व ते अशा रीतीने बाधित झाल्या- कारणाने त्यात चमत्कार मुळीच रहात नाही. तात्पर्य चिच्छक्तीच्या योगाने स्फुरण पावणारे मन स्पदामध्ये वायुन्वास, द्रवामध्ये द्रवत्वास, पृथ्वीमध्ये कठिनतेस व शून्यदृष्टीमध्ये शून्यत्वास (ह्मणजे अमुक एक वस्तु नाही या भावास ) प्राप्त होते. ते आपल्या अनिर्वाच्य शक्तीने शुभ्र वस्तूस कृष्ण- वर्ण कारते व कृष्णवर्ण वस्तूस शुक्लवर्ण भासविते. या चित्ताच्या शक्तीस योग्य देश व काल याचीही गरज लागत नाही मन दुसरीकडे आसक्त झाले असता तोंडात मधुर घास घालून तो चघळून जरी गिळिला तरी त्याची गोडी कळत नाही. तेव्हा यावरून चित्त ज्याचा अनुभव घेते त्याचाच जीवास अनुभव येतो व ते ज्याचा अनुभव घेत नाही त्याचा, प्रत्यक्ष उपभोग घेतला तरी, स्पष्ट अनुभव येत नाही, असेंच नाहीका ठरत ! इद्रियें व मन यास परस्पराचे सहाय घ्यावे लागते, हे खरे; पण इदिये मनापासून झालेली आहेत. मन इद्रियापासून झालेलें नाही, हे