पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५८ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, त्यावेळी मी त्या सभेत होतो व हा सर्व खेळ मी प्रत्यक्ष पाहिला आहे. यास्तव मन वासनामय आहे व वासनाचा उच्छेद हाच त्याच्या शातीचा उपाय आहे, असे तू नि सशय जाण १०९. सर्ग ११०-सा सर्गात वसिष्ठ मुनि मनोनाशाचा उपाय सागण्याकरिता, त्याच्या वैभवाचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-प्रिय राजपुत्रा, परम कारणापासून मन या अवस्थेस प्राप्त झालेले सस्कार किंवा वासनाच सर्व सखदु.खादिकाचे निमित्त आहे. भय अभय, दूर, समीप, शत्र, मित्र, बरे, वाईट इत्यादि सर्व कल्पना या मनामुळे होतात. कलकित मन हितकर वस्तूही अहितकर आहे, असे दाखविते. हे विष आहे अशी दृढ भावना करून अमृत प्राशन केले असताही प्राण्याच्या शरीरावर विषाचा परिणाम होतो. मानसिक वासनाच प्राण्यास मोहित करणारी आहे. वासना हे जाळे असून मनुष्याचे मन हे हरिण आहे. ससाररूपी वनातील त्या जाळ्यात मनोहरिण अडकले की. ते अत्यत परतत्र होते. यास्तव मूलोच्छेदपूर्वक मोठ्या प्रयत्नाने ती नाहीशी करावी. ज्याने विचाराने जीवाची ज्ञेय-वासना नाहीशी करून टाकिली आहे त्याचे तेज निरभ्र सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकत रहाते. यास्तव मन हाच पुरुष आहे, देह पुरुष नव्हे, असें तू समज. कारण देह केवळ जड आहे. पण मन जड व अजड आहे. करिता मनाने जे जे केले तेच पुरुषाने केले व त्याने जे सोडले ते पुरुषाने सोडिलें असेंच समजणे उचित होय. हे सर्व जग व त्यातील भूमि, आकाश, वायु-इत्यादि हे सर्व पदार्थ मनोमात्र आहेत. त्या त्या पदार्थाकडे आपले मन जर न लाविले तर त्याचे ज्ञान आपणास होत नाही. सूर्याकडे मन लाविलें नाही तर तो असून नसून सारिखाच होतो. ज्याचे मन मोहित होते त्यास मूढ ह्मणतात. ज्याचे शरीर मूढ ( ह्मणजे निश्चेष्ट ) होते त्यास मूढ ह्मणत नाहीत. तर त्यास मृत ह्मणतात. पाहू लागलेले मनच नेत्र होते; ऐकणारे मन श्रोत्रेद्रिय होते व अशाच रीतीने हे या शरीरात त्या त्या वृत्तीच्या योगाने नटाप्रमाणे अनेक वेष घेऊन नटते. ज्याचे चित्त स्वप्नाने आकुल झाले आहे अशा हरिश्चंद्रास चित्तप्रतिभासामुळे एक रात्र बारा वर्षांची भासली. ब्रह्मदेवाच्या नगरांत गेलेल्या इद्रद्युम्नाच्या एका मुहूर्तात चित्तप्रभा- वामुळे एक युग गेलें. हरिस्मरणरूप शुभ मनोवृत्तींच्या योगाने पुरुष सुखी