पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ बृहद्योगवासिष्ठसार. खावी तर त्यांची राख झालेली. माती खावी तर ती शुष्क, व दगड खावे तर ते चावत नाहीत, अशी सर्व बाजूनी पंचाईत झाली. मनुष्यांस मनुष्यांनी खाण्याचा प्रसंग आला. मुकलेल्या हाडांचे पीठ करून त्यान्यावरही आह्मीं काही दिवस काढले.पण अशाने किती दिवस निभाव लाग- णार ? पतीने स्त्रीच्या मुखाकडे, त्रीने पोराच्या तोंडाकडे व पोरांनी पापाच्या तोंडाकडे पाहून व हाय, हाय, अन्न, अन्न, पाणी पाणी असें ह्मणत आयुष्याचे राहिलेले दिवस काढणे आमच्या वाट्यास आले. ते स्थळ मूर्तिमान् यमगृहच झाले होते, एवढ्यावरून तुझी काय ते समजा १०८. सई १०९-या सर्गात, स्त्रीसह मी तेथून निघालों, मार्गात माझ्या एका पुत्रास फार क्षुधा लागली. त्याचे दुःख माझ्याने पाहवेना. तेव्हा मी जीवितास कटाळून चिता पेटवून त्यांत उडी घेऊ लागलों, इतक्यात देहभानावर आले, असें वर्णन राजा करितो. गना-देवाच्या प्रातिकूल्यामुळे तेथे अशाप्रकारचे असह्य कष्ट होऊ •ागले असता ज्याच्या अंगात सामथ्ये होते असे लोक ते स्थान सोडून आपापल्या कुटुबासह अन्यत्र जाऊ लागले व कित्येक दुबेळ एकमेकांच्या गन्यास मिठ्या मारून तेथेच मरून पडले. घरातून बाहेर पडलेल्या कि येकास मार्गामध्ये गाठन व्याघ्र-सिहानी आपली क्षुधा शात करून गली. कित्येक वणव्यात सापडून जळून गेले व कित्येक पर्वतशिखरा- सन मोठ्या शिलाप्रमाणे खाली घसरून मेले. दहा पावले टाकण्यासही -पम नमलेल्या वृद्ध सासूस व श्वशुरास तेथेच सोडून मी आपल्या । बामह तेथून निघालों. अग्नि, वायु, व्याघ्रादि पिसाळलेले हिंस्र पशु र नाग याच्या जबड्यात पडूं नये ह्मणून भीत भीत, आझी मार्ग आक्रम लागलो. त्या देशाच्या सीमेवर येऊन पोचताच एका तालवृक्षाच्या खाली, थोडीशी विश्राति घेण्याकरिता, खाद्यावरील पुत्रास खाली उतरून मी जरा बसलो. त्यावेळी रौरवातून निघाल्याप्रमाणेच मला समाधान वाटले. चांडाल कन्याही त्या वृक्षाच्या छायेत विश्राति घेण्याकरिता भूमीवर पडली व तिचा डोळा लागला. त्यावेळी तिच्या दोन्ही बाजूस दोन बालकेंही तिच्या अगावर हात टाकून निजली होती. पृच्छक ह्मणून आणखी एक पुत्र होता तो माझ्या पुढे येऊन, 'मला खावयास मांस व प्यावयास रक्त दे, असें ह्मणून मोठ्या रडू लागला. तो आह्मां उभयतांनाही फार आव-