पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५. बृहद्योगवासिष्ठसार. अनेक सकटे घालवितो त्याप्रमाणे मी तेथे तिच्यासह अनेक वर्षे घालविली. त्या ससारात मी अनेक कष्ट सोशिले. पोराना व स्त्रीला अन्न व वस्त्र कमे मिळेल या चितेने मला चागली झोपही लागत नसे. मी डोक्यावर चुबळ घेऊन त्यावरून, मूर्तिमत दुष्कर्माप्रमाणे, लाकडें वहात असे. मोठीशी फाटकी लगोटी हेच काय ते माझें वस्त्र. पण तेही उवानी भरलेले असून, कित्येक दिवस त्यास जलाचा स्पर्शही होत नसल्यामुळे दुर्गध येत असे. एका तृणाकरताही मी आपल्या शेजाऱ्याशी मोठा कलह करीत असे व प्रसगी पशूप्रमाणे एकमेकाची मस्तके फोडण्यासही मी तयार होत असें. दारिद्य व अज्ञान या दोघाची जोडी जमली की, गुणाचा व ज्ञानाचा सर्वम्वी न्हास होत असतो, असा नियम आहे. मी त्या अवस्थेत दरिद्री तर होतोच. पण मोहित झालेल्या माझ्या मनात अज्ञानानेही आपले आसन स्थिर केले तेव्हा औदार्यादि स्वाभाविक गुण व विद्या जर मला पारख्या झाल्या तर त्यात नवल ते कोणते? 'क्षीण पुरुष निष्करुण हातात' या न्यायाने मी आपल्या स्त्रीस व अपत्यास क्रूरपणाने वागवीत असे. त्याना मी किती अवाच्य शिव्या दिल्या असतील याचे तर गणितच करता येत नाही येथे माझा जरा कोणी अपमान केला तर तो मला अमह्य होतो. पण तेथे मला प्रत्यक्ष माझी पत्नीही काय हवे ते ह्मणत असे; माझ्या अगावर कर्कश वाणीने ओरडत असे. पण त्याचे मला कधीच काही वाटले नाही. रानडुकरास मारून, त्याचे मास खाऊन, उघड्या भूमीवर किवा मोठ्या सपाट पाषाणावर पडून आह्मी रात्रीच्या रात्री घालविल्या. द्रव्याचे फारसे बल नसल्यामुळे मी आपल्या सासऱ्याच्या गृहातच एकीकडे रहात असें. पुष्कळवेळा सासरा व सासू याच्याशीही मला भाडण्याचा प्रसग येई. कारण दुसऱ्याच्या गृहामध्ये राहिल्याने बराच उपमर्ग मोसावा लागतो व अपमानही वारवार होतो. यास्तव कलहाने त्याचा प्रतीकार केल्यावाचून राहवत नाही. पण शेवटपर्यत मला दुसऱ्याच्या घरातच आयुष्य घालवावे लागले. निग्रही तपस्ख्या- प्रमाणे मला तेथें शीत, उष्ण व वर्षाव यास सहन करावे लागत असे. पाण्यात जाळे पसरून किवा गळ टाकून मासे मारणे, वनांत फिरून शिकार करणे, जाळी पसरून जीवत पक्ष्यास धरणे, अवचित एकादा सधन वाटसरू भेटल्यास त्यास लुटणे इत्यादि कमें, श्रोत्रियाच्या वेदाभ्यासा-