पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ बृहद्योगवासिष्ठसार. तें मी तुला देईन. कारण स्त्रियास पति प्राणाहूनही प्रिय असतो." तिचे हे चमत्कारिक भाषण ऐकून मी जरा चकित झालो. हा अधर्म मी कसा करू? असे माझ्या मनात आले ? पण काय करणार ? आपत्तीमध्ये पडलेला प्राणी धर्म व अधर्म याच्याकडे फारसे पहात नाही. प्राण वाचविण्याकरिता मी तिचे झणणे मान्य केलें. तेव्हा तिने मोठ्या आनदाने मला त्यांतील अधे अन्न दिले. मी तें खावून व जबूफलाचा रस पिऊन तृप्त झालो. नतर मला तेथेच एका झाडाखाली विश्राति ध्यावयास सागून ती काळीकुट्ट चाडाळकन्या, जणु काय आपले प्राण मुठीत धरून, जवळच्याच एका शेतात काम करीत असलेल्या भयकर आकाराच्या आपल्या पित्याकडे गेली. तिने मजविषयीचा वृत्तात व आपला मनोरथ सास सागितला. व " बाबा, तुझास आवडत असल्यास मी त्याच्याशी लग्न करीन " असे ती त्यास ह्मणाली तेव्हा त्याने तिला बरे आहे. असे झटले. त्याने राहिलेले अन्न खाले व दिवस मावळे तो शेत नागरिले ती कन्याही तेथेच होती. मीही जरा विश्राति घेऊन ताजा तवाना झालो. सायकाल होताच त्या यमरूपी चाडालाने नागराचे बैल सोडिले व काळोख पडण्यापूर्वीच तो बैलास पुढे घालून तेथून निघाला. आझी दोघेही त्याच्या मागून चाललो व वेताळ जसे एका श्मशानातून दुसऱ्या श्मशानात जातात त्याप्रमाणे आह्मी सर्व दिवे लागतान' चाडाळवाड्यात आलो. तेथील भूमि रक्ताने माखलेली असून त्या वाळलेल्या रक्तावर माशा घोगावत होत्या. वानर, कोंबडी व कावळे याची सोललेली शरीरे अर्धी मुर्वी कापून घेऊन बाकीची टागून ठेविली होती. नानाप्र कारची चामडी बाहेर वाळत घातलेली असून त्याचा दुर्गध दूरवर येत होता. रात्र पडली होती तरी घारी, गिधाडे, इत्यादि मासाहारी पक्षी घरावर बसून हाती लागलेल्या आमिषास चोचीने तोड-तोडून उदरात साठवीत होते. लहान लहान अर्भकें हातात मासाचा तुकडा घेऊन तो चाटीत व मिटक्या मारीत द्वारावरून उभी होती अगण्यात बसलेली वृद्ध खोडे आरडाओरड करणाऱ्या पोरास शिव्यागाळी देऊन कोलाहल न करण्याविषयी ओरडून सागत होती. ठिकठिकाणी हाडाचे ढीग पडले होते. असो, अशा त्या यमनगरीसारख्या चाडाळ वाड्यात आझी सर्व शिरलो. आमन्या त्या नव्या श्वशरगृहीं पोचताच तेथील एका मनुष्याने