पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरणं-सर्ग २७. ४३ आहेत; हा इष्ट पदार्थ आहे; हा अनिष्ट आहे; इत्यादि उगिच अनेक कल्पना करून त्यातच मग्न होऊन रहातो २६. सर्ग २७-मोक्षाच्या विरोधी असलेल्या सर्व वस्तूंतील दोषाचे वर्णन, वैराग्य उत्पन्न व्हावे ह्मणून, येथे पुन केले आहे. महाराज, दुसरे असे की, या जगात मनास विश्राति देईल असे काही नाही. प्रत्येक वस्तु तृष्णेच्या द्वारा सताप देते. तृष्णा व समाधान याचे वैर आहे. त्यामुळे जेथे तृष्णा असते तेथे समाधानाचे नावही घ्यावयास नको, व समाधानाच्या अभावी सुखाचा लेशही प्राप्त होणे अति दुर्घट आहे. मोठमोठ्या लढाया करून, अनेक शत्रूस पादाक्रात करणारास मी शूर समजत नाही, तर देह, इद्रिये व मन यास आपल्या अधीन ठेव- णारास मी शूर समजतो. पण अशा प्रकारचा शूर या जगात कचित् निपजता. कारण देहादिकास आवीन ठेवण्याचे पेराग्यादि उपाय सुलभ नाहीत. सामान्य जन तर कर्मासारिख्या बाह्य उपायानीच ही मोठी मजल मारण्याची आशा करितात पण कर्मानुष्टानाच्या योगाने सकाम कर्मठाच्या चित्तास विश्राति मिळत नाही कीर्तीच्या योगाने जग, प्रतापाच्या योगाने दश दिशा, सपत्तीच्या योगाने याचकाचे गृह व क्षमा, विनय, औदार्य इत्यादि सात्त्विक गुणाच्या योगाने सपत्ति जे भरून सोडितात (सुशोभित करितात ) ते महात्मे सुलभ नव्हेत. कारण कीर्ति, प्रताप, दातृत्व व क्षमा- विनयादि वस्तूच अलभ्य आहेत, व अशा अल्पफलदायी वस्तूही जर दुर्लभ्य झाल्या आहेत तर मग परम फलदायी मोक्षाविषयी काय सागावे ? प्राणी कितीही जरी एकातात जाऊन लपून बसला, तरी त्याच्या भाग्या- प्रमाणे, आपत्ति व ऐश्वर्य त्यास हुडकून काढितात. आरभी पुत्रादि सर्व विषय आनददायी वाटतात खरे, पण परिणामी तेच महा शत्रु होतात. अत-समयी सर्व पापाचरणाचे स्मरण होते व धर्माचरण न केल्या- विषयी मोठा पश्चात्ताप होतो काम व अर्थ याचे सपादन कर- ण्यातच सर्व काल गेल्यामुळे धर्माचरणास अवकाशच रहात नाही. अथवा प्रत्यक्ष सुख देणाऱ्या या कामार्थापुढे अप्रत्यक्ष, परपरेने किवा मरणोत्तर सुख देणाऱ्या, धर्माची योग्यताच मनुष्याच्या ध्या- नात येत नाही. तेव्हा त्याच्या चित्तास समाधान कोठून व कसे होणार? अगोदर ही कर्तव्ये करूं या; मग ही करू; पुढे या कर्तव्याची