पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सग १०६. १५१ खरोखर त्या रमणीस पाहून मला पुराणातरी ऐकिलेल्या मोहिनीच्या रूपाचेच स्मरण झाले. मी त्या सुंदरीजवळ गेलो व झटलें “हे कुमारि, मला अतिशय क्षुधा लागली आहे. दोन दिवस अन्न व जल यांचे दर्शनही न झाल्यामुळे माझे प्राण व्याकुळ झाले आहेत. यास्तव, बालिके, मला हे अन्न व जल दे. (प्राण जाण्याचा प्रसग आला असता त्यांच्या रक्षणार्थ कोणाच्याही हातचें व अभक्ष्यही अन्न-जल घेतले तरी त्यात दोष नाही, असें धर्मशास्त्रात, उपनिषदात व वेदातसूत्रात सागितले आहे.) मी दीन होऊन तुजजवळ ही याचना करीत आहे व दीनाचे दुःख नाहीसे केले असता मोठे पुण्य लागून शिवाय रोहक उत्कर्षही होत असतो. क्षुधेसारिखे दुसरे दुःख नाही. नागीण क्षुधेनें व्याकुर झाली असता आपली अडीही खाते, हे तुलाही ठाऊक असेलच. (दुष्काळ पडला असता मनुष्यही आपल्या पोटच्या गोळ्यास विकून आपले दग्धोदर कसे भरीत असतात हे आमा दुर्दैवी भारतीयास तरी अलीकडे चागले ठाऊक झाले आहे.) सभासदानों, याप्रमाणे मी तिच्यापाशी याचना केली. पण तिने मला काहीएक उत्तर दिले नाही. पण मी तिच्या मागून चाललो. ती एका वनातून दुसऱ्यात, दुसन्यातून तिसन्यात अशा क्रमाने त्वरेनें जात होती व मीही छायेप्रमाणे तिच्या मागे होतो. पुष्कळ दूर गेल्यावर ती मला ह्मणाली, " अरे हारकेयूरयुक्त सत्पुरुषा, मी राक्षसी-सारखी कर व मनुष्ये, अश्व, गज, इत्यादिकासही खाणारी चाडाली आहे तेव्हा मी दिलेले अन्न तुझ्या उपयोगाचे नाही. पण इतके असूनही तू ते खाण्यास तयार असलास तरी सुद्धा नुस्त्या याचनेनें तें तुला मिळणार नाही." इतकें बोलून ती कन्या जाता जाता माझ्याशी विनोद करू लागली; सरळ मार्गाने जावयाचेच नाही; मध्ये उगीच उभे रहावयाचें; माझ्याकडे पाहून हंसावयाचेंच इत्यादि तिच्या चेष्टा पाहून मलाही थोडीशी अन्नाची आशा वाटली. बराच वेळ मी काही बोलेन ह्मणून तिने वाट पाहिली व शेवटी ती आपण होऊनच मला झणते, "तू जर माझा भर्ता झालास तर मी हे अन्न तुला देईन. कारण सामान्य जन स्नेहावाचून उपकार करीत नाहीत. माझा पिता या जवळच्याच शेतात नांगर हाकीत आहे. त्यास भूक लागली असेल. वस्तुतः हैं अन्न त्याचे आहे. पण तू जर माझा पति होत असशील तर