पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०६. ४४९ त्यात जिकडे पहावे तिकडे मृगजल दिसत असे. पण खऱ्या जलाचा एक बिंदुही मला मिळेना! पण आता दिवस अगदी थोडा उरला आहे, असे जाणून मी पुनः त्या घोड्यावर बसलों व विवेकाच्या सहायाने सुज्ञ जसा भयंकर ससारसागर तरण्यास सज्ज होतो, त्याप्रमाणे मी त्या अरण्यांतून पार जाण्यास तयार झालो. सर्व दिवसभर शून्य आकाशात फिरून सूर्याचा अश्व त्यास जसा शेवटी अस्ताचलास पोचवितो त्याप्रमाणे त्या माझ्या अश्वार्नेही मला त्या मोठ्या अरण्यातून पार नेऊन दुसऱ्या एका अरण्यात पोंचविले. त्यात जबू ( जाबुळ ) व कदब वृक्ष फार होते. पक्ष्यांचे मधुर ध्वनी ऐकू येत असत. त्यात जलाचाही अगदीच अभाव नव्हता. त्यामुळे कोठे कोठे उगवलेले हिरवे गवतही आढळत असे. त्यामुळे माझ्या मनाला थोडेसे बरे वाटले कारण मरणाच्या असह्य दुःखाहून व्याधीचे दुःख जसे प्राण्यास पतकरते त्याप्रमाणे पूर्वीच्या त्या नीरस अरण्याहून मला हे दुसरे अरण्य बरे वाटले. माझा घोडा त्यातून वेगाने चाललाच होता. त्याला थाबविण्याकरिता मी पुष्कळ यत्न केला, पण दरिद्याच्या सेवकाप्रमाणे तो माझा अव्हेर करून वेगाने पुढेच चालला. तेव्हा आता काय करावे, या विचारात मी पडलो. तो मला जबीर वृक्षाचा समूह समोर दिसला व दैववशात् तो माझा उद्दाम घोडाही त्याच्या खालूनच चालला. तेव्हा मी मोठ्या धैर्याने त्यातील एका वृक्षाच्या शाखेस दोन्ही हातानी घट्ट धरिले. त्याबरोबर गंगास्नान करिताच सर्व दुरिते जशी पार निघून जातात त्याप्रमाणे तो चपल अश्व माझ्या खालून निघून गेला दीर्घ प्रवासाने थकून गेल्याका- रणाने मी त्यावेळी फारच खिन्न झालो होतो. ह्मणून मला घोडा गेल्याचे मुळीच वाईट वाटले नाही. मी अगोदर त्या वृक्षाखाली स्वस्थ बसलो. मला त्यावेळी तो जबीरवृक्ष कल्पतरूप्रमाणे सुखकर वाटला. पण इत- क्यांत सूर्यास्त होऊन सर्व प्राण्याचे पुण्यकारक व्यवहार बद झाले असता अंधकाराने सर्व भूगोलास व्यापून टाकिले व त्याबरोबर त्या जगलात रात्रिंचराचे अशुद्ध व्यवहार सुरू झाले. त्यामुळे माझें हृदय अति- शय भयभीत झालें व कापू लागले. मी क्षत्रिय व राजा आहे, हे विस- रून गेलो. आता या काळरात्रीतून मी कसा पार पडणार, ही चिंता माझ्या मनास जाळू लागली. रात्रिंचर हिंस्र प्राण्यापैकी कोणी मला पाहूं नये ह्मणून मी त्या वृक्षाच्या ढोलीत, घरव्यात लपून बसलेल्या