पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४७ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०९. व्याकुळ झाले आहे. आपण आपले सहज धैर्य का सोडितां? आपल्या चित्तास भ्रम झाला आहे, असे दिसते. पण आपल्यासारिख्या विवेक्यास भ्रमाची बाधा व्हावी हे मोठे आश्चर्य आहे. सामान्य पामर जनाचें चित्त सकृदर्शनी रमणीय वाटणान्या पण अनुभवाती विरस ठरणान्या विषयामध्ये जसे आसक्त होते तसे आपले उदार चित्त मोहयुक्त होणे चागले नव्हे. कारण त्याच्या व तुमच्या-ज्ञान, धैर्य, अभ्यास, अनुभव, प्रभाव, इत्यादिकात महत् अतर आहे. सतत विवेकसपन्न असलेल्या आपल्या अतरगास मोह स्पर्श करण्यास तरी कसा समर्थ झाला ? कारण मत्र, तत्र, इत्यादिकाचा प्रभाव असस्कृत चित्तावर घडत असतो. सस्कृत- चित्तावर त्याचा काही परिणाम होत नाही. तर महाराज, सावध व्हा व आमच्या सशयित जीवितास आधार द्या. राघवा, त्याचे हे उत्साह- जनक भाषण ऐकून तो राजा चागला शुद्धीवर आला. त्यामुळे त्याच मुख पूर्वीप्रमाणे शोभू लागले. शिशिर ऋतु सपून वसत लागला असतां वृक्षास जशी टवटवी येते त्याप्रमाणे राजाचे प्रसन्न मुख पाहून सभास- दाच्या तोंडावर टवटवी आली. पण समोर असलेल्या ऐंद्रजालिकास पाहून राजाचे मुख आश्चर्य व भय याच्या छटेने युक्त झाले. तथापि मोठ्या धैर्याने तो त्यास ह्मणाला, " अरे अविचाराने काम करणाऱ्या गारुड्या, तू काय हे केलेंस ? विवेकाच्या योगाने अति बलवान्–झालेल्या माझ्या मनासही तू मोहात पाडिलेंस ? खरोखर परमात्म्याच्या प्रत्येक पदार्थामध्ये शेकडो अद्भुत शक्ति असतात. लौकिक व्यवहारातील सिद्धा- ताचे रहस्य जाणणारे आझी कोटें व आताच मी अनुभविलेल्या भापती- प्रमाणे मनास भयकर मोह पाडणान्या आपत्ती कोठे ? महाज्ञानाचा ज्यास परिचय झाला माहे असें मन जसे केव्हा केव्हा देहावर अहभाव ठेवित त्याठमाणे बुद्धिमानाचे मनही केव्हा केव्हा मोहात पडते, यात सशय. नाही. असो; सभासदानों, या मायावी पुरुषाने थोड्याशाच वेळात मला अनेक चंचल दशा दाखविल्या. पूर्वी एकदा एकट्याच इद्राला गांठन. त्याचा पराभव करावा अशा उद्देशाने बलि पातालातून निघाला. तेव्हां देववशात् त्यास इंद्र एकटाच भेटला. पण युद्ध करण्यास सज्ज झालेल्या बलीस इद्राने भापस्या मायेने नानाप्रकारची सेना निर्माण करून मोहित केलें व त्यास त्या मोह-पाशानेच बांधले. तेव्हा बलीने ब्रह्मदेवाची