पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४६ बृहद्योगवासिष्ठसार. आहे. आमच्या प्रभूने झणजे सिंधुराजाने हे रत्न तुला मोठ्या आनदाने अर्पण केले आहे. कारण योग्य वस्तूचा समागम अतिशय शोभत असतो." अश्वपाल इतके बोलत आहे तो ऐंद्रजालिक राजास ह्मणतो, " हे प्रभो, याच्यावर आरूढ होऊन सूर्याप्रमाणे तू सर्व भुवनात विहार कर." ते ऐकून राजा आपल्या आसनावरून त्या अश्वाकडे टक लावून पाहूं लागला. काही वेळाने तो अगदी निश्चष्ट होऊन चित्राप्रमाणे स्तब्ध बसला. बाह्य दृष्टीचा त्याग करून योगी जसा अतरगातील परमानदात निमग्न होऊन रहातो तशी त्याची अवस्था झाली. राजाची ती अपूर्व दशा पाहून सभे- तील सर्व लोक भयभीत झाले. त्या सभेतील स्वाभाविक कोलाहल आपो- आप व एकाएकी बद झाला. प्रत्येक लहान-थोर सभासद राजाच्या निश्चल स्थितीकडे आश्चर्याने पहात राहिला. कोणाला काही सुचेना. राजाच्या विलक्षण प्रभावामुळे त्यास स्पर्श करण्याचेही कोणास धैर्य होईना व त्या कारणाने जो तो किकर्तव्यतामूढ होऊन स्वासोच्छासही न करिता स्तब्ध होऊन बसला १०४. सर्ग १०५-या सर्गात-राजा सावध होऊन मोह-अवस्थेतील आपला अनुभव ___ सागू लागला-असे वर्णन करितात. श्रीवधि-रामराया, तो राजा चार घटिका मोहावस्थेत होता. व त्याचे मुख्य अधिकारी आता काय करावे, या चितेत निमग्न होते. पण त्यांतील अनुभवी वृद्ध आपापल्या मतीप्रमाणे उपाय योजीत आहेत तों तो भूपाल आपोआप सावध होऊन नेत्र, हात इत्यादि चाळवू लागला. त्यामुळे सभेतील सर्वासच आनद झाला, हे सांगणे नलगे. पण त्या उत्तम वीराच्या अगांतील शक्ति त्यावेळी क्षीण झाली होती. त्यामुळे त्याचे हात पाय कापू लागले व तो आपल्या उंच सिंहासनावरून एकाएकी खाली पडूं लागला. तेव्हा जवळच्या त्याच्या परिजनानी त्याला धरिलें. त्याचे चित्त अजून भ्रमण करीत होते. मी आपल्या सभेत बसलो आहे, याचेही त्यास भान नव्हते. आपल्यास कोणी तरी धरून बसविले आहे, असे पाहून तो मंदस्वराने ह्मणतो--मी कोठे आहे ! हे इतके लोक येथे का जमले आहेत. ते ऐकतांच मंत्री भयभीत झाले व त्याच्याजवळ माऊन माज्या आदराने मणाले-महाराज, भापण हे असे काय विचारिता!. मापली एकाएकी अशी अवस्था का शाली ! आमचे चित्त अतिशय