पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४२ बृहद्योगवासिष्ठसार. निश्चय कर व असत्याचा त्याग कर. अनत आत्मतत्त्व बद्ध होणे मुळीच शक्य नाही. पण असे असूनही मी बद्ध आहे, असे खोटेंच समजून तू उगीच कष्टी का होतोस ? नाना व अनाना ह्मणजे द्वैत व अद्वैत या दोन्ही प्रकारच्या कल्पना जेथें नाहीत अशा ब्रह्मामध्ये बद्ध काय असणार व मुक्त काय आहे ? आरोग्य, व्याधि इत्यादि सर्व देहाचे धर्म आहेत. आत्म्याचे नव्हेत; असे समजल्यावर देह नाहीसा झाला, तुटला, क्षीण झाला किवा त्याचे आणखी काही झाले तर त्यात आत्म्याची कोणती हानि आहे ? लोहाराचा भाता जरी एकादे वेळी जळला तरी त्यामुळे त्यातील वायूची काही हानि होत नाही. त्याप्रमाणे हा देह पडो, उठो, आकाशात उडून जावो की, पृथ्वीत गडप होवो त्याच्याहून अगदी विलक्षण असलेल्या माझी त्यापासून काही हानि होणे शक्य नाही. रामा, मेघ व वायु अथवा भ्रमर व कमल याचा जसा सबध होतो त्याचप्रमाणे तुझे शरीर व तुझा आत्मा याचा सबध झाला आहे व भिन्न वस्तूंचा सयोग अनित्य असतो हेही तुला ठाऊक आहे. शरीरादि सर्व जग मनो- मात्र असल्यामुळेही शरीराचा नाश झाला तरी मन असे पर्यंत त्याकरिता शोक करणे उचित नव्हे. मग ते आत्ममात्र असल्यामुळे शरीरनाशा- करिता शोक करणे युक्त नव्हे, हे काय सागावे ? रामा, मन हे सर्व जगाचे सूक्ष्म शरीर आहे. कारण ते जगाची कारणभूत आद्य शक्ति आहे. तेव्हा जगाचा नाश झाल्याने त्याचा नाश होणे शक्य नाही. मग मनाचेही कारण अथवा त्याच्याही पलीकडे असलेला जो भात्मा त्याचा नाश कसा होणार ? तस्मात् आत्म्याचा नाश होतो अशी भ्राति सर्वथा युक्त नव्हे. मेघ छिन्न भिन्न होऊन गेला ह्मणजे व वायु किंवा कमल सुकून गेले हणजे भ्रमर जसा आकाशात उड़न जातो त्याप्रमाणे देहक्षय झाला असता मन- उपाधियुक्त आत्मा अन्यत्र जातो. संसारात दीर्घकाल भ्रमण करणाऱ्या मनाचाही नाश ज्ञानावाचून होत नाही. मग आत्म्याचा कसा होणार ? भाड व त्यातील बोरे किंवा घट व त्यांतील आकाश यांचाच न्याय देह व आत्मा यासही लागू आहे. भांडे फुटले असतां बोरे हातात घेतात व भाडे टाकितात. त्याप्रमाणे देह-पात झाला की, आत्मा अनंत आकाशांत जातो. कुभ फुटला तरी त्यांतील आकाश नाश न पावतां जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणे देह क्षीण झाला तरी देही अबाधित रहातो.