पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. दुख देणारे आहेत; आयुष्य अति चपल आहे; तारुण्याची योग्यता काय आहे, याचे वर्णन मी मागे ( सर्ग २० ) केलेच आहे, बालपण तर अज्ञा- नात जाते, सर्व प्राणिवर्ग विषयचितनाने कलकित झाला आहे; व इद्रियेच शत्रु झाले आहेत. आत्मा सत्य असतांना तो असत्य वाटतो व देह असत्य असताना तो सत्य वाटतो. मन हा शत्रु आपलाच घात करीत असतो अहकार आपल्या स्वरूपासच काजळ फासतो; बुद्धिवृत्ति निर्जीव झाल्या आहेत, शरीराच्या क्रिया व्यर्थ होतात, मनोरथ विषयमय झाले आहेत, मन स्त्रीच्या चितेत पडले आहे, आत्म्याचे चमत्कार दिसेनातसे झाले आहेत, स्त्रीया दोषाचे बज आहेत व सर्व पदार्थ नाशप्रस्त झाले आहेत. हे साधो, स्वभावत च प्राण्याचे अतःकरण व्याकुल होते; विषयासक्ति वाढते, वैराग्य दुर्लभ होते, दृष्टि रजोगुणाने आच्छादित होते, अविवेक वाढतो, सत्त्वगुण पारखा होतो व आत्मतत्त्व तर अत्यत दूर होते. जीवन अस्थिर ठरते, मरण जवळ आले आहे, असे वाटू लागते, धैर्य सुटते, स्वल्प फल देणाऱ्या वस्तूवर प्रेम बसतें व बुद्धि मूर्ख होते, हे खरे, पण शरीरादि सर्व अनित्य आहे व प्रसगीं कोणी कोणाचा नाही, हे विवेकाने चागले समजते. मुनिराज, पर्वत, नद्या, पृथ्वी, सूर्य, चद्र, तारागण, सिद्ध, गधर्व, देव, दानव, यम, शुक्र, वायु, ब्रह्मा, विष्णु, महेश, शकर इत्यादि महा वस्तूचाही जेथे चूर होऊन जातो तेथे माझी किवा माझ्या सारख्या दुसऱ्या क्षुद्राची काय कथा ? ज्याचा शब्द कधी ऐकू येत नाही, ज्याच्या विषयी काही बोलता येत नाही, जे कधी दिसत नाही व ज्याला आकार नाही अशा कोणत्याशा एका भ्रमदायी तत्त्वाने ही सर्व भुवने खोटीच रचिली आहेत; व त्यात अहकाररूपाने राहून तेच तत्त्व सर्वाचे नियमन करिते. त्याने ज्यास आपल्या वश करून घेतले नाही, असा एकही पदाथे या त्रिभुवनात नाही. सूर्य, भूलोक, वायु, देव, असुर, मनुष्ये इत्यादि सर्वास ते तत्त्व आपापल्या कामात नियुक्त करितें व त्याच्याकडून सर्व कमें बरोबर करवून घेते. सर्व 'मी, मी' ह्मणणाऱ्यांनी त्या सर्व शक्तिमानापुढे हात टेकिले आहेत. या जीवस्थितीतील अनर्थाचे किती वर्णन करावे. सर्वत्र असुख पसरले आहे. पण अज्ञ प्राण्यास हे समजत नाहीं; व त्यामुळे तो आज हा उत्सव आला; उद्या यात्रा आहे; हे आमचे आप्त आहेत; हे वैरी