पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०२, १०३. ४११ रामा, त्या धात्रीने सागितलेली ही शुभ कथा ऐकून त्या अव बालकास मोठा चमत्कार वाटला. चित्ताख्यानानतर जगाचा अनुभव केवल विकल्पमात्र आहे, असें जे मी सागत होतो तेच दृढ करण्याकरिता दृष्टातरूपाने मी ही कथा तुला सागितली आहे. या धात्रीच्या कल्पित कथेप्रमाणेच आपल्या उप संकल्पाच्या योगाने ही जगस्थिति दृढ झाली आहे. सर्व सकल्पाच्या अधीन आहे. राजपुत्र, नद्या, भविष्यनगर, वृक्ष इत्यादि जसे संकल्प ( कल्पना ) तसेच बध, मोक्ष, ससार, आकाश, वायु, पृथ्वी इत्यादि सर्व सकल्प होत. यास्तव हे सत्पुरुषा, तू आत्म्या- पासून उद्भवणान्या सकल्पाचा हा सर्व विलास आहे, असें निःसंशय जाणून व त्या सर्वांचा त्याग करून परमात्मरूप हो आणि शांतीचा अनुभव घे १०१. सग १०२, १०३-या सर्गात अहकारसकल्पाच्या क्षयाचा उपाय, अनात्म्याचा विवेक, परमात्म्याची नित्यता व मूढ मनाची अनर्थावह यात्रा याचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामा, मूढ आपल्या सकल्पाच्या योगानेच मोहांत पडतो. पण पडित अक्षय वस्तूमध्ये उगीच क्षयाची कल्पना करून त्याच्याप्रमाणे मोहात पडत नाही. श्रीराम-पण, गुरुराज, सकल्प करणारा कोण ? व तो सकल्प कशाचा करितो ? ते मला सागा. श्रीवसिष्ठ-सिह, व्याघ्र, इत्यादि प्राणीच मी आहे, अशी अहं- वासना ज्यास आहे, असा अविद्योपहित परमात्माच सकल्प करितो. अहं हाच त्याच्या सकल्पाचा विषय आहे. पण तो अहभाव आत्म्याचा स्वभाव नसल्यामुळे आत्म्याप्रमाणे नित्य नाही तर अनित्य आहे. कारण एक परिपूर्ण वस्तूच जर सर्वत्र स्थित आहे तर हा 'अह' मध्येच कोठून आला, हे सागता येत नाही. ह्मणून तो मिथ्या आहे. सूर्याच्या प्रखर उन्हा- मध्ये अज्ञ मार्गस्थास जसा जलाचा भास होतो त्याप्रमाणे अखड वस्तूस न जाणणाऱ्या अनात्मज्ञास या अहकाराचा अनुभव येतो. मन हाच एक महा चिंतामणी असून सप्तार हे त्याचेच कार्य आहे. यास्तव रामा, निराश्रय भ्रातीचा त्याग करून साश्रय, सत्य व भानंदरूप अशा यथार्थ ज्ञानाचा आश्रय कर. मोहशून्य व विचारयुक्त अशा बुद्धीने सत्याचा