पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार. श्रीण होऊ लागले. त्यांना पणे व पुष्पें यांनी व्याप्त असे तीन रमणीय वृक्ष दिसले. अनेक प्राणी त्याच्या आश्रयाने राहून आपला सताप कमी करीत होते. पण त्यातीलही दोन वृक्ष मुळी जन्मासच आले नव्हते व तमन्याचे बीजही भूमीत पडले नव्हते. स्वर्गात वृक्षाखाली बसून विश्राति घेणान्या-इद्र, अग्नि, व यम-यांच्याप्रमाणे ते राजपुत्र त्यातील एका वृक्षाखाली बसून, त्याची अमृतासारखी गोड फळे खाऊन व त्याच्या पुष्पाच्या माळा गळ्यात घालून जरा ताजे झाले. त्यांचा तो सताप जरा कमी झाला. नतर ते पढ़ें जाऊ लागले. मध्याहसमयी त्यास तीन नद्या लागल्या. त्यांतील एक अगदी शुष्क होती व दुसन्या दोन नद्यांत पाण्याचा थेबही नव्हता. उन्हाने सतप्त झालेले जन अथवा ब्रह्मा, विष्णु व महेश जसे गगेमध्ये स्नान करितात त्याप्रमाणे त्या तिघांनी त्या नद्यात मोठ्या आदराने स्नान केले. अमृतप्राय जल प्याले व यथेच्छ जलक्रीडा केली. काही वेळाने ते पुढे निघाले व सायकाळी भविष्य नगरास पोचले. ते नगर पाताकाच्या योगाने सुशोभित केले होते. त्यात रमणीय व भव्य जलाशय होते. नगरस्थ जनांच्या गायनाचा ध्वनि त्यात चोहोकडे ऐकू येत होता. त्यात त्यास तीन रत्नखचित सुवर्णाची गृहे दिसली. ती अतिशय रम्य व पर्वतशिखरासारखी उच होती. पण त्यातील दोन बाधलीच नव्हती व तिसऱ्याच्या भीतीही अजून झाल्या नव्हत्या. ते तिघे त्यात शिरले व तेथे विहार करू लागले. काही वेळाने त्यास तेथे तीन स्थाल्या मिळाल्या. त्या उची सोन्याच्या केलेल्या असून फार रमणीय होत्या. पण त्यातील दोघींची खापरेही दिसत नव्हती व तिसरीचे चूर्ण झाले होते. त्यानी ती तिसरी स्थाली घेतली व त्यांत पुष्कळ अन्न शिजविलें. नतर तीन ब्राह्मण सागितले. त्यांतील दोघांना देहच नव्हते व तिसरा मुखरहित होता. बाळा, त्यातील त्या तोंडावांचून असलेल्या तिसऱ्या ब्राह्मणाने ते सर्व खाऊन टाकिलें. पण बाकीचे अन्न खाऊन ते राजपुत्रही तृप्त झाले व त्याच भविष्यन्नगरांत आनंदानें राहिले. ते अद्यापि तेथे मृगयादि विहार करीत सुखाने काल घालवीत भसतात. पुत्रा ही सुदर गोष्ट तूं ध्यानात ठेव. झणजे मोठा शहाणा होशील.