पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्म १०१. ४३१ आणि त्या कुकल्पनेमुळेच मोक्ष व मोक्षाचे शास्त्रीय उपाय याची कल्पना करावी लागते. पण ज्ञान्याच्या दृष्टीने त्यातील काही सत्य नाही. साराश प्रथम मन, त्यानतर बंध व मोक्ष-दृष्टि, त्याच्या मागून भुवनसज्ञक प्रपंच- रचना, या क्रमाने ही जगस्थिति, हे साधो, बालकास दायीने सागि- तलेल्या गोष्ठीप्रमाणे कल्पनेने प्रतिष्ठित झाली आहे १००. सर्ग १०१-या सर्गात पूर्वोक्त आख्यायिका सागतात. श्रीराम-हे मुनिश्रेष्ठ, दायीने बालकास सागितलेली ती गोष्ठ आपण मला सागा. कारण तिच्या श्रवणाने सकल्पविकल्पात्मक मनाचे मूळ जो संकल्प त्याचा निरोध केला असता निर्विकल्पपदप्राप्ति कशी होते, ते चागले समजेल, असे मला वाटते. श्रीवसिष्ठ-होय. रामा, तू ह्मणतोस ते खरे आहे. शिवाय सकल्पा- पासूनच मिथ्या ससार कसा होतो, हेही तुला ती गोष्ठ ऐकून समजेल. कोणी एक युक्तायुक्त-विचारशून्य बालक एकदा आपल्या दायीस ह्मणाला, "दायि, माझा वेळ जात नाही. मला कटाळा आल्यासारखा झाला आहे. यास्तव मला एकादी चागली गोष्ट साग. तेव्हा त्याच्या चित्तरजनाकरिता ती त्याला एक सुदर गोष्ट सागू लागली. बाळा, एक अत्यत असत् नगर होते. त्यात तीन धार्मिक, शूर व महात्मे राजपुत्र होते. ह्मणजे विस्तीर्ण व शून्य आकाशात जशी नक्षत्रे असतात त्याप्रमाणे त्या विस्तीर्ण व शून्य नगरात ते विराजमान होत असत. पण त्यातील दोघे जन्मास आले नन्हते व एक गर्भाशयातही आला नव्हता. पुढे देववशात् त्याचे बाधव मरण पावले दुर्भिक्षादिकामुळे त्याची मुखें म्लान झाली. तेव्हां दुसऱ्या एकाद्या उत्तम नगरास जाण्याच्या इच्छेने ते तिघेही तेथून निघाले. पण त्या सुकुमार राजपुत्रास सूर्याच्या प्रखर तापाने फार कष्ट झाले. तापलेल्या वाळूत त्याचे पाय पोळू लागले. त्याना जन्मांत कधी चालण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते अतिशय थकले. त्याच्या पायात पुष्कळ काटे बोंचले; ठेचा लागून बोटे फुटली; घेरी येऊन ते खडकाळ भूमीवर पडले. त्यामुळे त्याची अगें छिन भिन्न झाली व असे हाल झाल्यामुळे ते तिघेही “अहो बाबा, भगे आई " असें अणून रडू लागले. पण सुखाप्रमाणेच दुःखही क्षणिक अथवा कांहींकाल रहाणारे असते, असा नियम असल्यामुळे काही वेळाने त्याचे दुःखही