पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ बृहद्योगवासिष्ठसार. शून्यशक्ति आकाशात, व अस्तित्व शक्ति सर्व भवस्थितीत आढळते. याप्र- माणे ब्रह्माच्या अनंत शक्ति दहाही दिशामध्ये अनुभवास येतात. फळे, पुष्पे, डाहळ्या, पाने, शाखा, स्कध, मूळे इत्यादिकानी युक्त असलेला वृक्ष आपल्या बीजात जसा सूक्ष्मरूपाने रहातो त्याप्रमाणे अज्ञात ब्रह्मांत जग रहाते. चित्त हे प्रथम कार्य आहे. ह्मणजे तो पहिला विकार अथवा परिणाम भाहे व ते ( चित्त ) चिद्रूप व जडरूप असे उभयरूप आहे, असा अपणास अनुभवही येतो. त्यामुळे त्याचे कारण अज्ञात ब्रह्मच आहे, असे मानावे लागते. कारण अज्ञानावाचून चित्तात जाड्य हा धर्म असणे शक्य नाही व ब्रह्मावाचून चित् हा धर्म असणे शक्य नाही. यास्तव, रामा, हे जग व है जीवतत्त्व प्रत्यक्-चिद्रूप ब्रह्मच आहे, असे तू सतत जाण. मन हीच ब्राह्मी ( ब्रह्माची) शक्ति आहे व तीच सर्व करिते. अविद्या, काम, कर्म इत्यादि सर्व ही शक्तिच आहे. हिच्या सर्व शक्ती ब्रह्माच्या शक्ती झाल्या आहेत. सर्व ऋतु-शक्ति सर्व बृक्षामध्ये एकसारिख्याच असल्या तरी त्यावर येणारी फळे, पुष्पें, इत्यादि जशी नियमाने येतात झणजे फण- साच्या झाडावर आवे, आब्याच्या झाडावर पेरु इत्यादि अव्यवस्था जशी होत नाही त्याप्रमाणे मनाच्या शक्तींचाही संकर होत नाही. तर त्या नियमाने व्यक्त व अव्यक्त होतात. पृथ्वीमध्ये अकुर उत्पन्न करण्याची शक्ति असते. पण ती त्यास नेहमी उत्पन्न करीत नाही. तर कालादि सहायक साधनाची अपेक्षा करिते. त्याप्रमाणे मनाच्या द्वारा व्यक्त होणाऱ्या ब्रह्मशक्तीसही देश, काल, अवस्था इत्यादिकाचे सहाय लागते व त्यामुळे सर्व शक्ति एकाच मनात व एकाच वेळी उद्भ- वत नाहीत. पण रामभद्रा, या शक्तीही काल्पनिक आहेत, हे तू विसरू नको. हे सर्व मनाचे प्रतिभास आहेत. त्याला जसे जसे सस्कार होतील तसे तसें तें कल्पना करील, हे महा तत्त्व न विसरतां त्याला सतत शुभ मंस्कार करीत रहावें. सर्वत्र एक ब्रह्मसत्ता आहे. दुसरी सत्ता नाही. करण, कर्म, कर्ता, जनन, मरण, स्थिति इत्यादि सर्व ब्रह्म आहे व हे गूढ तत्व ज्यास कळते त्याला लोभ नसतो, मोह होत नाही; तृष्णा नसते, व आसक्तिही नसते. कारण सर्व आत्मरूप आहे, असा निश्चय झाल्यावर लोभादि कसे होणार ? आत्माच अनात्म्यासारखा झाला सणजे जर्जाव होतो. मी बद्ध आहे, असे समजणे हीच त्याची कुकल्पना आहे,