पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १००. लागावे तसतसे ते अधिक-अधिक विक्षिप्त होऊन पळू लागते. पण त्यामुळे कंटाळा न करिता चिरकाल निरोध-अभ्यास करीत राहिल्याने व असग आत्म्याची भावना केल्याने त्याचा निरोध होऊ लागतो व त्यानंतर पुनः त्यास शोक करण्याचा प्रसग येत नाही. मनाच्या प्रमादा( अनवधाना )मळे पर्वत-शिखराप्रमाणे दुःखें वाढतात व तेंच विवेकवश झालें असतां त्याचा क्षय होतो. तात्पर्य जे चित्त यावज्जीव शास्त्रीय शुद्ध वासनेने युक्त होऊन मुनीप्रमाणे निरोध-अभ्यासात रममाण होते ते शेवटी तत्त्वबोधाच्या द्वारा अति पवित्र पर ब्रह्मास प्राप्त होते आणि जीवतपणीच ज्यास शात स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे, असा तो जीवन्मुक्त पुरुष मोठमोठ्या आपत्तीतही शोक करीत नाहीं ९९. चित्तोपाख्यान समाप्त झाले. सर्ग १००-या मनाच्या शक्तीनेच ब्रह्म सर्वशक्ति झाले आहे, असे येथे सागतात. श्रीवसिष्ठ--रामा, बधमोक्ष-कल्पना मनाच्याच अधीन आहे. याविषयी मी आता तुला युक्ति सागतो. समुद्रापासून उद्भवणान्या तरंगा- प्रमाणे ब्रह्मसज्ञक परम पदापासून हे तन्मय व अतन्मय चित्त उत्पन्न झाले आहे. ते अज्ञानाचा विकार आहे, ह्मणून ब्रह्ममय नव्हे. ( म. अत- न्मय ) व शुद्ध ब्रह्माचा विवर्त आहे ह्मणन ब्रह्ममय. ह्मणजे ज्याप्रमाणे तरग जलाचा विकार व त्याच्या सत्तेचा विवर्त त्याप्रमाणे चित्त अज्ञानाचा विकार व ब्रह्माचा विवर्त आहे जलाच्या सत्तेकडे लक्ष्य देणाऱ्या लोकास तरग समुद्राहून निराळा भासत नाही; त्याचप्रमाणे, रामराया, ज्ञानी पुरुषाचे मन ब्रह्मरूपच असते. त्याहून निराळे नसते समुद्राप्रमाणेच तरंगातही जलसत्ता आहे, असें न जाणणाऱ्या मनुष्यास समुद्र व तरंग भिन्न वाटतात. त्याचप्रमाणे अज्ञानी पुरुषाचे मन ब्रह्माहून भिन्न भासते व तेंच ससारभ्रमाचे कारण होते. एवढ्या करिता गुरु, शिष्य, शास्त्र इत्यादि सबै कल्पना अज्ञाकरिता व अज्ञान अवस्थेच्या उपयोगी आहेत, असें मी मागे सागितले आहे. अज्ञात ब्रह्मच सर्व जगाचे कारण होते व तेच सर्वशक्ति, नित्य, अव्यय, परिपूर्ण, इत्यादि आहे. तो भगवान सर्वशक्तिसंपन्न असल्यामुळेच आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तें करितो व सर्वगामी असल्यामुळे हवी ती आपली शक्ति वाटेल तेथें व्यक्त करतो. रामा, त्याची चिच्छक्तिच सर्व प्रकारच्या शरीरांमध्ये अभिव्यक्त होते. स्पंद- शक्ति वायूंत, जडशक्ति पाषाणात, द्रवशक्ति जलांत, तेजःशक्ति अनीत,