पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३६ बृहद्योगवासिष्ठसार. असे दुःख होणे साहजिक आहे. शेवटी तो पुरुष हसला ह्मणून म हटले आहे. त्याचे कारण त्यास पूर्ण विवेक झाला, हे होय. विवेक प्राप्त झाल्यामुळे ज्याने ससार-स्थितीचा त्याग केला आहे त्यास परम् आनद होणे व तो उत्तरोत्तर वाढणे उचितच होय. ज्ञानानतर मनाने आपल्या अगास तिरस्काराने पाहिले. कारण तीच आपणास अनर्थात पाडणारी आहेत, हे त्यास ज्ञानसामर्थ्याने कळून चुकले होते. मिथ्य विकल्पाने रचलेल्या यानी मला फार दिवस फसविले, असे वाटल्या वर हसू येणे योग्यच आहे. विवेकाने सपन्न झालेले मन अपरिच्छिन्न पदा मध्ये मिळून जाते व त्यानतर पूर्वीच्या दीनतेचा आधार असे जे विषयजात त्यास दुरूनच पहाते. त्या पुरुषास मी बलात्काराने अडवून धरून प्रश्न केला असें ह्मणून विवेक चित्तास बलात्काराने आपल्या स्वाधीन ठेवू शकतो असे सुचविले आहे. त्याची अगे गळून पडली व तो दिसेनासा झाला याचा अर्थ असा की, मनोनाश झाला असता विषयासह विषयतष्ण शात होते चित्ताच्या अनत आकृति असल्यामुळे त्या पुरुषास सहस्र बाहु व सहस्र नेत्र होते, असे मी झटले आहे कुकल्पना हेच आपल्या हाताने आपल्य पाठीवर केलेले प्रहार होत. नानाप्रकारच्या वासनानी अस्थिर होऊन अनेक कल्पना करीत मुटणे, हेच मनोरूपी पुरुषाचे पलायन होय. चित्र आपल्याच इच्छेने आपणासच वासनारूपी मुद्गाराचे प्रहार कसे करीत असते हे प्रत्येकाने आपापल्या चित्तभूमीत पहावे. राघवा, अज्ञानाचा हा खेळ कसा अचिंत्य आहे, त्याचाही तू विचार कर. वासनाच्या योगाने अत्यर सतप्त झालेली सर्व मने आपण होऊनच त्या ब्रह्मपदास जाणण्यास योग्य होऊन पळू लागतात. झणजे हे विस्तृत दुःख मनाच्या योगानेच व्यक्त होते व तें मनच स्वतः खिन होऊन त्याच्यापासून दूर जाऊ लागते. सकल व वासना त्याच्या समूहाने ते आपणच आपल्यास बाधून घेते. पुढील दुःखाकडे दुर्लक्ष्य करून मूखे बालक ज्याप्रमाणे दुर्लीला करू लाग त्याप्रमाणे मन चचल होऊन अनथे ओढवतील असेच वर्तन करू लागते आपलें इद्रिय लाकडाच्या फटीत गेले आहे हे न जाणता चिरकरानी व ठोकून ठेविलेल्या खुटीस हलवून उपटणाऱ्या वानराप्रमाणे हे मन आप ल्याच कुकल्पनानी अनर्थात पडते. त्याचा निरोध करण्याकरितां थोडास प्रयत्न करून काही लाभ होत नाही. कारण आपण जसा जसा प्रयत्न करं