पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ९९. १३५ कदली-वनात प्रवेश करून सुख भोगणारे पुरुष झणजे यज्ञयागादि काम्य कम किंवा इतर शास्त्रीय आचरण करून स्वर्गी गेलेली मनेंच होत. असे तूं जाण. अंधकूपांत प्रवेश करून पुनः बाहेर न पडणारी मनेंच (पुरुष) महापातकी असतात. कदलीवनातून परत न फिरणारे पुरुष ( मनें ) महा उपासक असतात व कटकादिकानी भरलेल्या करंजवनांत पडून तेथून बाहेर न पडणारे पुरुष मानव होत. त्यांतील कित्येक विवेकी होऊन मुक्त होतात. पण पुष्कळसे अविवेकीच राहून जन्ममरण-परंपरेत पडतात. त्यांतील कित्येक अधोगतीस जाऊन नरकात पडतात व कित्येक ऊर्ध्वगामी होऊन मनुष्यादि ऊर्च लोकास जातात. रघुनदना, करंजवन कुटुबप्रेमानें परिपूर्ण असते. त्यामुळे त्यात पडलेल्या मनास दुःखरूपी कटकाची असह्य पीडा होते. आणि त्या कारणाने मानुष्य हे विविध इच्छांनी युक्त आहे. त्या अरण्यात प्रविष्ट झालेल्या मनास मनुष्य हे सामान्यनाम प्राप्त होऊन ती मोठी रसिक ( विषयी ) बनतात. चद्राच्या किरणाप्रमाणे शीतल व मनास आनद देणारे कदलीवन ह्मणजे स्वर्गलोक होय, हे तुझ्या ध्यानात आलेच असेल. त्यात गेलेल्या मनातील कित्येक मने शास्त्रविहित पुण्या- चरण व धारणा, ध्यान इत्यादिकाच्या योगाने स्थिर केलेली उपासना या किंवा अशाच दुसऱ्याही, कारणामुळे ग्रह, सप्तर्षी, ध्रुव इत्यादि शरीरें धारण करितात आणि त्या कारणाने इतराच्या अपेक्षेने त्याचें तेज, भोग व आयुष्य अधिक असते. जे भज्ञ माझा बुद्धि व चित्त याच्या योगाने तिरस्कार करितात झणजे विवेकनिश्चय किंवा स्मरण करीत नाहीत ते मनोरूपी पुरुष विवेकाचाच तिरस्कार ( उपेक्षा ) करितात. " तू मला पाहिलेंस व त्यामुळे मी नष्ट झालों; तू माझा शत्रु आहेस" असें जें वर झटलें आहे ते तत्त्वज्ञानानें क्षीण होणा-या चिचाचे दुखोद्गार होत. राघवा, पहिला पुरुष रडला झणून मी तुला सांगितलें माहे. ते भोगसम्ह सोड- णान्या मनाचें रोदन होय. ज्याला थोडासा विवेक प्राप्त झाला असून परमपद लाभलेलें नसते त्या मनास भोगांचा त्याग करितांना अतिशय दुःख झेते. रडणाऱ्या त्याने मापली अंगें पाहिली, असे मी तुला सांगितले होते. तेंही मनाचेंच कर्म होय. कारण " अरेरे, मी ही फार दिवसांची परिचित मंगें सोड्न कसें जाऊं?" असें मण्न तें रहू लागले. कारण पूर्ण विवेक प्राप्त होण्यापूर्वी स्नेह, लोभ, कुटुंब, पुत्र इत्यादि अंगांस सोडतांना