पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. पांतून कदलीवनांत, कदलीवनांतून काटेऱ्या खळग्यांत व त्या खळग्यातून पुनः कदलीवनांत किंवा अंधकूपांत असे एकसारखे फिरत होते. पण कित्येक एकदा जेथे जाऊन पडत तेथेच गडप होऊन रहात. काम्य- धर्मामध्ये परायण असलेल्या कित्येकास तर कोठेच स्थिर स्थिति मिळत नसे. रामभद्रा, अशाप्रकारचें तें विस्तृत महा अरण्य अजून विद्य- मान आहे व त्यांत मी वर्णन केल्याप्रमाणे व्यवहार करणारे अनेक पुरुषही आहेत. तुझ्याचमुळे ज्याच्यातील सर्व व्यवहार होत आहेत, असें तें अरण्य तूही पाहिले आहेस. पण तुझा विवेक प्रगल्भ नसल्यामुळे तुला त्याचे स्मरण नाही. बाबारे, ते अरण्य अतिशय भयकर आहे खरे; पण आत्मबोध नसल्यामुळे ज्यास शातीचा लाभ झालेला नसतो त्यांस ते उत्तम पुष्पवाटिकेप्रमाणे रमणीय व आनंददायी वाटते ९८. सर्ग ९९.-भाता या सर्गात वरील चित्ताख्यानाचे तात्पर्य सांगतात. श्रीराम-गुरुवर्य, आपण सागता तें अरण्य कोठे आहे ? मी ते केव्हा व कसे पाहिले ? त्यांतील पुरुष कोण व ते काय करीत आहेत ? ते मला सांगा. भीवसिष्ठ-रामा, ते अरण्य व पुरुष कोठे दूर नाहीत. हा अपार संसारच ते महा अरण्य आहे. तें परमार्थदृष्टीने असत् असल्यामुळे त्यास शुन्य असें मटले आहे. पण भ्रांतीने ते अनेक विकारानी भरलेले आहे. असे वाटते. ह्मणून त्यास अशात असें ह्मणतात. विचाररूपी प्रकाशाच्या योगाने तें भयरहित व एका अद्वितीय वस्तूने परिपूर्ण झाले असता यशून्य होते. त्यांत मनें हेच एकसारखे भ्रमण करणारे व महा आकारानी युक्त असलेले पुरुष होत व ते मनोरूपी पुरुषच दुःखांत पडतात. यांची अवस्था पहाणारा जो मी तो विवेक भसन विवेकरूपी मीच त्यांची ती दुर्दशा पाहिली. विवेकावांचून दुसऱ्या कोणीही नव्हे. विवेकच त्यांस बोध करितो. पण सर्वच पुरुष त्याचा उपदेश ऐकत नाहीत. त्यांतील जे विवेकाचे ऐकितात ते शांतरूप होऊन परम पदांत डीन होतात व पुनः त्या महारण्यात दिसत नाहीत. पण त्यांत मोहित शालेल्या अविवेस्यांचाच फार मोर भरणा असल्यामुळे विवेकाचें न ऐक- णारे व त्यास तुच्छ समजणारेच फार. माझा तिरस्कार केल्याकारमाने त्यांतील बरेच मंधांत पडतात. तेच नरकयातना भोगणारे पापी होत.