पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९८. १६ पुरुषा, तू कोण आहेस ! हे तुझें काय चालले आहे ? व हा सर्व दुःखदायी व्यवहार तूं का करीत आहेस ? तुझें नाव काय व तूं असें खुळ्यासारखें आपलेच अहित कां करतोस ? त्यावर तो अणाला-मुने, मी कोणी नाही व काही एक करीत नाही. तू माझ्या कर्मात विघ्न आणिलेंस. यास्तव तूं माझा मोठा शत्रु आहेस. तूं मला पाहिलेंस व त्यामुळे माझें दुःख व सुख ही दोन्ही नाहीशी झाली. असें बोलून व आपली विकल अंगें पाइन तो अतिशय रडू लागला. काही वेळाने आपले रडे आवरून त्याने मा- पल्या अगांकडे पुनः पाहिले व मोठ्याने हास्य केलें. हंसून झाल्यावर त्याने क्रमाने आपली अगें टाकिली. प्रथम त्याने तें आपनें भयंकर मस्तक (झणजे सकल्प ) टाकिलें त्यानतर त्याने बाहूचा (विकल्पांचा) त्याग केला. पढ़ें वक्षःस्थल (विषयाभिमान) व उदर ( तृष्णा) याचाही त्याग करून नियतीच्या शक्तीनें तो कोठे तरी जाण्यास तयार झाला. पण पुढे तो कोठे गेला व काय झाले, ते मला समजलें नाही. रामा, दुसऱ्या एका एकातस्थळी मी तसलाच आणखी एक पुरुष पाहिला. तोही आप- ल्याच पाठीवर मारून घेऊन वर सांगितल्याप्रमाणेच अधकूपादिकांत वारंवार पडत असे. त्याला काही वेळ सुखाचा अनुभव येत असे व काही वेळ तो दुःख भोगीत असे. त्यालाही मी पूर्वीप्रमाणेच • अडवून विचारिलें; तेव्हा तोही प्रथम रडून, शेवटी हसून व अवयवाचा त्याग करून अदृश्य झाला. तसाच मी आणखी एक पुरुष पाहिला. त्याही मूलाने आपल्याच हाताने आपला घात करून घेतला व तो अधकूपांत जाऊन पडला. तो त्यांतून बाहेर पडेल ह्मणून मी दीर्घ काल त्या कूपाच्या कांठावर बसून वाट पाहिली. पण तो शठ बाहेर पडलाच नाही. तेव्हा मी तेथून उठून दुसरीकडे जाऊ लागलों. इतक्यांत त्या कूपांत पडण्याकरिता पळत येणाऱ्या एका आत्मघातक्यास मी पाहिले. तेव्हां त्यास अडवून मी प्रोक्त प्रश्न केला. पण त्याने माझ्या बोलाण्याकडे लक्षच दिले नाही. उलट तो माझा धिकार करून तसाच आपणास मारीत, ओरडत, रडत व पळत पढ़ें बालता झाला. बा राघवा, याप्रमाणे त्या भयंकर अरण्यांत फिरताना मी असे अनेक दुराचारी पाहिले. त्यातील कित्येक माझ्या प्रश्नाने विचार सुक होउन पूर्वोक्त प्रकारे स्वरूपनाशलक्षण शांतीस प्राप्त झाले. किये। नी माझे आणणे न ऐकतां उलट माझी निंदा केली. कित्येक मंधक . २०