पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ बृहयोगवासिष्ठसार. बोरडत होता. पण काही वेळाने या असल्या आत्मघातकी कृत्याने तो अगदी थकन गेला. त्याचे शरीर विवश झाले. त्याचे हात-पाय मोडून गेल्यासारखे निर्बल झाले व शेवटी तो एका मोठ्या थोरल्या अंधकूपामध्ये पडला. त्यात भयंकर अधकार पसरलेला होता. इतकेच नव्हे तर त्याच्या विस्ताराचाही आकाशाप्रमाणे अत लागत नसे. त्यामुळे काही न दिसणे, एकसारखें पडत रहाणे व त्यांतही कोठेच आधार न मिळणे या तीन आपत्तींच्या योगाने अतिशय क्लेश भोगावे लागत होते. पुष्कळ काल लोटल्यावर तो त्यातून बाहेर पडला. पण पुन• पूर्वीप्रमाणेच आपल्या हाताने आपणास मारून घेऊन तो पळत सुटला व काटे, दगड, कांटेरे वृक्ष, वेली, इत्यादिकानी भरलेल्या वनात पडला. त्यास करज-वन ह्मणतात. त्यास तेथे फार दुःख झाले. ते त्याचे पडणे, हापटणे, ठेचाळणे, रडणे, इत्यादिकास तर त्यावेळी परिमितिच नव्हती. अंगात मोठमोठे काटे घुसल्या- मुळे त्या दीन पुरुषास किती कष्ट सोसावे लागत होते याची नुस्ती कल्पनाच केली पाहिजे. असो, पण काल सर्वांवर उपकार करीत असतो. त्यामुळे बऱ्याच कालानतर तो त्यातूनही बाहेर पडला व एक क्षणभर समाधान मानीत आहे, तोच पुनः त्याला दुर्बुद्धि झाली. तो पुनरपि आपल्या पाठीवर आपल्याच हातांनी प्रहार करू लागला. ते असह्य झाल्यामुळे त्यास पळत सुटणे भाग पडले. तो पुनः दूर पळत गेला. तेव्हां दैववशात् त्याला एक शीतळ कदलीचे वन लागले. त्यांत गेल्यावर याला आनंद झाला. पण आनदाचा काल लवकर संपतो, असा सामान्य नियम आहे. त्यास अनुसरून त्याचा तो आनंदही फार वेळ टिकला नाही. कालाने त्याला त्यातून बाहेर काढिले. कदलीवनांतून बाहेर आल्या- वर त्याचें तें पूर्व कर्म पुनः सुरू झाले. त्यामुळे तो पहिल्याप्रमाणेच पुनः सैरा वैरा धावत सुटला. फार दूरवर गेल्यावर तो पूर्वीच्याच अंधकूपांत पंडला. पण त्यातून निघून आपल्याच कर्मामुळे तो पुनः त्या कदलीवनांत गेला. तेथून निघून पुनः त्यास करज-अरण्यात पडावे लागले. त्याचा हा क्रम एकसारखा चालला होता. त्या पुरुषास विश्रांति कशी ती मुळीच मिळत नव्हती. तेव्हा रामा, त्या महा पुरुषाची ही आश्चर्यकारक चक्रतुल्य गति व दीर्घ काल चाटलेला हा त्याचा उपन्याप पाहून मला दया भाली व योगबलाने त्यास मार्गात क्षणभर भडवून मी असे विचारले.-भरे वा