पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरणं-सर्ग २६. ४१ जल्यास सूर्यादि गोल ही त्याची नाना प्रकारची खेळणीं आहेत, असा भास होतो. कल्पांती हा भयंकर राक्षसच होतो. हा कृपण, रात्र हीच जुनी केरसुणी घेऊन प्राण्याची आयुष्ये झाडून नेतो व पुनरपि दिवसां सूर्यरूपी दिवली हातात घेऊन कोनाकोपऱ्यात काही राहिले तर नाही ! म्हणून मोठ्या काळजीने हुडकतो. साराश, सर्वाचे चूर्ण करणारा हा काल, कर्ता, भोक्ता, सहर्ता, स्मर्ता, इत्यादि अनेक नावास पात्र झाला आहे. या सृष्टिरूपी अरण्यात मृगया करणारा हा कोणीएक व्याधच आहे, असा भास होतो. प्रत्येक प्राण्यास दोन काल अनुभवावे लागतात. त्यातील क्रियाकाल प्रथम येतो व फलकाल मागहून येतो. या फलकालासच दैव ह्मणतात. फलसिद्धि हेच त्याचे रूप आहे. या देवरूप कालाच्या पाशात सापडून सर्व प्राणिसृष्टि क्लेश भोगीत राहिली आहे. हे विस्तीर्ण जग हीच त्याची नृत्यशाला आहे व त्यात ते (देव) सतत नृत्य करीत असते. कृतात हे त्याचे तिसरे नाव आहे. नियति ( ह्मणजे कृतकर्माचे फल अवश्य मिळणे ) ही त्याची पत्नी असून तिच्या ठायी हा अतिशय आसक्त होतो. शेप, चंद्रकला, शुभ्र गगाप्रवाह, सूर्यादि मडले, ब्रह्माडे, ताराचक्र, मांगर इत्यादि सर्व तिच्या अंगावरील भूषणे आहेत. ती आपल्या कृतातमज्ञक पतीबरोबर मोठ्या हर्षाने नानाप्रकारचे नृत्य करीत असते. कल्पातसमयी तर त्याच्या नृत्यास फारच रग चढतो. पण पुढे ती दोघेही आपले श्रम- दायी नृत्य बद करितात. काही कालानतर पुन. सृष्टि-समारभ होतो व नियति पुनरपि सुदर नाच करू लागते, साराश या कालाचे वारवार तेच ते कृत्य चालते २३, २४, २५. सर्ग २६-या सर्गात वैराग्य उत्पन्न व्हावे ह्मणून कालादिकाच्या अधीन असणाऱ्या ___या ससाराची दुर्दशा वर्णिली आहे. तेव्हा, हे महामुने, अशाप्रकारच्या या काललीलेमध्ये माझ्या सारिख्यानी आस्था कशी ठेवावी ? या दैवादि कालभेदानी जणु काय आम्हास विकतच घेतले आहे, असे वाटते. या सृष्टिरचनेकडे पाहून आम्ही चकित होऊन रहातो. हा दुराचारी काल आमास आपत्तींत पाडितो; दैव आमच्या अत- राम्यास होरपळून सोडते; नियति आमचे धैर्य हरण करिते; कृतात आमच्या शरीराचा नाश करितो व निर्दय यमराज "हा भात आहे" असें समजून दया करीत नाही. गुरुराज, सर्व भूतवर्ग तुच्छ आहे,विषय भयंकर