पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९८. ४५१ आकाशादिकाची कल्पना करीत आहे, हे तू विसरू नकोस. सारांश मायाशबल चिदाकाशापासून सर्व भूतें व भूतकार्ये झाली आहेत. चित्त या रूपास प्राप्त झालेले चित्चें मलिन रूपच हे त्रिभुवनरूपी जग निर्मित. (ह्मणजे चित्ताच्या कार्यामध्ये मालिन्य दिसत असल्यामुळे ते (चित्त) शुद्ध चित्चे कार्य आहे, असें ह्मणता येत नाही.) तसेच चित्ताचा अनुभव अज्ञासच येत असल्यामुळे ते अज्ञानाचे कार्य आहे, असे ह्मणावे लागते. साराश मूर्खपणाने बध व ज्ञानबलाने मोक्ष प्राप्त होतो ९७. सर्ग ९८-पूर्वोक्त तत्त्व चागल्या रीतीने समजावे ह्मणून या सर्गात चित्ताचे __ आख्यान व त्याच्या नाशाचा उपाय सागतात. श्रीवसिष्ठ-रामा, जीवास, नित्य मुक्त अशा आल्याच्या अज्ञानामुळे, मनोभ्रातीने बधाचा अनुभव येतो, असा निर्णय करण्याकरिता मन अज्ञात आत्म्यापासून उत्पन्न होते, असे येथवर सविस्तर सागितले. पण रोगाच्या तत्त्वाचा निर्णय व्हावा ह्मणून वैद्य रोगास कारण झालेल्या आहारविहारा- दिकांचे जसे वर्णन करितात त्याप्रमाणे इष्ट मनस्तत्त्वाचा निर्णय झाल्यावर त्याच्या उपायाविषयी विचार करणेच उचित होय. ह्मणून, बा राघवा, सर्व अनर्थांचे व अर्थाचेही कारण मन, कसेही व कोणापासूनही, जरी उत्पन्न झालेले असले तरी त्या विचारात फारसा काल न घालवितां न्याम आत्म्यामध्ये निरुद्ध करण्याकरिताच प्रयत्न करावा. कारण चित्त आत्म्यामध्ये समाहित झाले की आत्म्याचा नित्य मोक्ष होतो. समाहित चित्त शुद्ध व वासनारहित होते. वासनाच्या अभावी त्याच्या स्वाभाविक कल्पना पार निघून जातात व त्यामुळे ते आत्मरूप होते. त्याने आत्म्या- मध्ये तादाम्य पावणे हाच मोक्ष आहे. हे सर्व चराचर जग व बंधमोक्षही चित्ताच्या अधीन आहेत. आता मी तुला चित्ताख्यान सांगतो, तें चित्त लावून ऐक. __ अति विस्तत, शून्य, शात व अति भयकर असें एक अरण्य होते. त्यांत शेकडों योजनें लाब व रुंद असलेला प्रदेशही एका कणा- एवढा दिसत होता. त्यात एकच पुरुष असून त्यास सहस्र हात सहस्र नेत्र होते. त्याची मति अति व्याकुल झालेली असून तो मयंकर प विक्राळ आकाराचा दिसत असे. तो आपल्या सहस्त्र बाडूंमध्ये अनेक परि घेऊन आपल्याच पाठीवर प्रहार करीत भीतीने इतस्ततः पावत