पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३० बृहयोगवासिष्टसार श्रीवसिष्ठ-राघवा, ज्याचा अतर्भाग अतिशय विस्तृत आहे अशी तीन आकाशे आहेत. एक चित्ताकाश, दुसरें चिदाकाश व तिसरे भूता- काश. आपल्या सर्व कार्याशी याचा एकसारखाच सबध असतो. ह्मणून यास सर्वसामान्य असे ह्मणतात. ती तिन्ही आकाशे आपल्या सर्व कार्यामध्ये अनुगत असतात. ह्मणजे ती ज्यात नाहीत असे त्याचे एकही कार्य नसते. पण तीन आकाशे आहेत, असें ऐकताच अद्वैताची हानि झाली, असे कदाचित तुझ्या मनात आले असेल. पण न्या तिन्ही आका- शाची सत्ता एक आहे. ह्मणजे एका शुद्ध चित्च्या सत्तेनेच ती सत्तायुक्त झाली आहेत व आमचा अद्वैत वाद एका सत्तेला उद्देशूनच आहे. ति- घाची जर एकच सत्ता असली तर चिदाकाशात दुसऱ्या दोघाहून विशेष तो कोणता ? ह्मणून विचारशील तर सागतो. बुद्धि, मन, इत्यादि मातर पदाथे व वस्त्र, लेखनी, इत्यादि बाह्य पदाये याची उत्पत्ति व नाश यास जाणणारा व सर्वाच्या अत करणात असणारा जो साक्षी तंच मायाशबल चिदाकाश होय. सर्व भूताच्या सर्व व्यवहारास कारण होत असल्यामुळे मर्व भूताचा हितकर, सर्व इद्रिय व शरीरे याचे नियमन करणारा अस- ल्यामुळे श्रेष्ठ, व कालादिकाची कल्पना करणारा असा जो हा एक अदृश्य अवकाश आहे तेच चित्ताकाश होय. त्याने आपल्या कल्पना-शक्तीने हे सर्व दृश्य जग व्यापून सोडिलें आहे. दश दिशेत सर्वत्र पसरलेले व पदार्थ- मात्रास अवकाश देणारे जे हे आकाश तेच प्रसिद्ध आकाश आहे. वायु, सूर्य, मेघ इत्यादि सर्वाचें तें आश्रयस्थान आहे. बाहेरचे हे भूताकाश व आतर चित्ताकाश याचा उद्भव चिदाकाशाच्या बलावर झाला आहे. सूर्य आपल्या अस्तित्वाने व सानिध्याने ज्याप्रमाणे प्राण्याच्या सर्व व्यवहाराचे नि- मित्त होतो त्याप्रमाणे चिदश चिदाकाशाचें केवल सानिध्यामुळे निमित्त होतो. " मी जग आहे व मी चेतन आहे" असा जो चितूचा मलिन निश्चय तेच मन आहे, असें तू जाण. त्याच्या योगानेच आकाशादिकाचा अनुभव येतो. पण हा सर्व क्रम आत्मतत्व न जापणा-या अज्ञांस तत्वो- पदेश करण्याकरिता कल्पिलेला आहे. वस्तुतः शुद्धचित्-पासून काही उत्पन झाले नाही व कशाचा नाशही होत नाहा. हणून जानी पुरुषाच्या दृष्टीने तुझ्या आक्षेपांस अवकाश रहात नाही. राक्या, तं जोवर आत्मतत्त्वाविषयी अज्ञ आहेस तोवर उपदेशाकरिताच मी या का