पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ बृहयोगवासिष्ठसार. व पाषणासारखें जड मनही त्याचे कारण नाही. तर उभयरूप मनच या प्रपचाचे कारण आहे. मन असेपर्यंत जग. त्याचा लय शाला की, जग संपले. एकाच कालाचे ऋतूमुळे जमे विभाग होतात त्याप्रमाणे एकाच मनाचे कर्मामुळे विभाग होतात व त्यांस भनेक नावे रूढ होतात. चित्तरहित शरीरास महकार, इंद्रियें, इत्यादि इतर भाव जर क्षुब्ध कर- ण्यास समर्थ झाले तर जीवादि पदार्थ चित्ताहून निराळे आहेत, असे मामी मण. पण त्यांतील एकाही पदार्थात तें सामर्थ्य नाही. सणून सर्व जग मनोमय आहे व सर्वाचे कारण मनच आहे, असे आह्मी निःशकपणे झणतो. निरनिराळे दर्शन(शास्त्र)कार भिन्न भिन्न तर्क करून आपापल्या बुद्धीप्रमाणे निर्णय करितात, हे खरे; पण त्यांचे ते निर्णय साप्रदायिक शिक्षेने युक्त नसतात. त्यांचे अज्ञान व बुद्धीचे ढोषही त्यांस यथार्थ निर्णय करू देत नाहीत व या मनोदेवाच्या स्वाभाविक कुतर्कशक्तीही त्यास अमार्गाने विचार करावयास लावितात, असा अनुभव माहे. त्यामुळेच प्रत्येक पक्ष आपले आपले मत ग्राह्य, शुद्ध व अबाधित माहे, असें निःशंकपणे मानितो व प्रत्येक पक्ष परस्पर विचित्र आहे. (अणजे एकाचे मत दुसऱ्याशी जुळत नाही; दुसऱ्याचे तिसऱ्याशी जुळत नाही.) त्यामुळे श्रद्धाजड होऊन आपापल्या पक्षाविषयी आग्रह धरणे यावाचुन त्यांस गत्यंतर नसते. आमच्या मताचा प्रकार तसा नाही. आली तर्क करितो. नाही करीत असें नाही. पण तो श्रुतीस अनुसरून करितों. श्रुतीने सचेतन कोळ्यापासून जड तंतु जसे उद्भवतात; जड पृथ्वीमध्ये सचेतन औषधी जशा उगवतात व जीवंत पुरुषापासून केस व नखें जशी वाढतात त्याप्रमाणे नित्य ज्ञानस्वरूप पुरुषापासून प्रकृति उत्पन होते, असे सांगितले आहे (प्रकृति झणजे मनच होय.) व त्यास अनु- सरूनच माही हे सर्व जगत् पुरुषापासून उद्भवलें आहे, असा सिद्धात ठरवितो. अर्थात् आमचे मत श्रुतिसंमत आहे. वस्तुतः विवादाचे कारणच नाही. पण जगाच्या स्वाभाविक वैचित्र्याबरोबर हे मतवैचित्र्यही रूड शाळे माहे ९६. •सर्ग ९७-मनस सर्व पायाच्या पाचराने स्थित बाहे, बसें बांबून या सगात पितामसादि तीन भाकासाचे वर्णन करितात.