पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२६ बृहद्योगवासिष्ठसार. इंद्रिये, इत्यादिकास विचित्र नावे स्वेच्छेने देतात. कोणी मनास जड समजतात. कोणी तें जीवाहून निराळे आहे, असे मानितात. कोणी बुद्धि, अहंकार इत्यादिकाविषयीही अशीच काही तरी कल्पना करितात. मी तर तुला, एका अंतःकरणाचेच ते सर्व भेद आहेत, हे वर सागितलेंच आहे. पण नैयायिक, साख्य, चार्वाक, जैमिनेय, जैन, बौद्ध, वैशेषिक, पाचरात्रादिक, यांस ते आमचे झणणे पटत नाही. त्यांतील प्रत्येक भिन्न भिन्न कल्पना करितो. त्याच्या कल्पनेची दिशा तुझ्या ध्यानात यावी ह्मणून काही उदाहरणे देतो. नैयायिक-अहकार हे एक द्रव्य असून तोच विभु जीव आहे, मन अणु व त्याच्या साक्षात्काराचे करण आहे; बुद्धि हा त्या जीवात्म्याचा गुण असून ती त्रिक्षणावस्थायिनी (तीन क्षण रहाणारी) आहे, असे समजतात. सांख्य-बुद्धि हेच साक्षात् त्रिगुणात्मक प्रकृतीचे महत्तत्त्वनामक कार्य आहे; अहकार हे त्या बुद्धीचे कार्य आहे; व ते महत्तत्त्वाइन भिन्न तत्त्व आहे, मन हे अकरा इद्रियातील एक इद्रिय व षोडशविकारातील एक विकार आहे, असें ह्मणतात. चार्वाक- चैतन्य हा देहाचा गुण आहे. शरीर व बुद्धि याच्यामध्ये काही भेद नाही. अहंकार हाच आत्मा, व त्याचे पूर्वापर प्रतिसधान हेच मन होय, असे प्रतिपादन करितात. जैमिनेयातील काही मीसासक मन हे विभु द्रव्य आहे, असें मानितात व काहीं तें अन्नमय आहे, असे समजतात. तसेच प्रकाश व अप्रकाश या दोन्ही रूपानी युक्त असलेल्या काजव्याप्रमाणे जड व बोधरूप अहंकार हाच आत्मा असून त्याचा चिदश हीच बुद्धि आहे, असे ते मानितात. आर्हत् ह्मणजे जैन-शरीरा एवढेच ज्याचे परिमाण आहे असा चिद्रूप जीवास्तिकाय हाच अहकार आहे; त्याचा विषयाभि- लाष हेच मन व विषयज्ञान हीच बुद्धि आहे-असे आपल्या शिष्यास शिक- वितात. बौद्ध-क्षणिक आलयविज्ञानसज्ञक जी बुद्धीची (अहं अशी) धारा तोच भात्मा व अहकार आहे. तो प्रवृत्तिविज्ञानरूप असतो. त्याचा बाह्य विषयाकार परिणाम झणजेच बुद्धि होय व नुक्ताच आलेला अनुभव ह्मणजे मम-असें ठरवितात. वैशेषिक अहंकार व मन याची कल्पना नैयायिकांप्रमाणेच करितात. पण बुद्धि-स्मृति, प्रत्यक्ष, भनुमान, तर्क व विपर्यय-या पांच मेदांनी युक्त आहे, असें अधिक समजतात. याचरात्र- वासुदेवास्य परमात्म्यापासून सकर्षणाक्ष्य जीव उत्पन होतो,