पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९६. ६५ शक्तीस माया सणाचे. दर्शन, स्पर्शन, श्रवण, रसन, व वास घेणे या कर्माच्या योगानें कार्य-कारणतेस प्राप्त झालेल्या संवित्-शक्तीस व्यवहारांत किया भसें मणतात. तात्पर्य मी अज्ञ आहे; मला अमुक एक वस्तु ठाऊक नाही, किंवा मी कोण हे मला माहीत नाही,अशाप्रकारे साक्षात् अनुभवास येणारा जो अज्ञान-कलक अथवा विषयांच्या योगानें प्राप्त झालेला जो द्वैतकलंक त्याच्या सानिध्यामुळे पूर्ण स्वरूपांत न्यूनता येऊन आकुल झालेली व देहादिकांच्या जाव्य-जाळ्यांत पडलेली जी मनोमय सवित् तिचीच ही सर्व नावे आहेत. चित्त या स्वरूपास प्राप्त झालेल्या तिनंच आपल्या सकल्पाने ही सर्व नांवें कल्पिली आहेत. रामा, परमात्म्यापासून (ह्मणजेच आपल्या परमात्मभावापासून) च्युत झालेल्या व कलकयुक्त अशा या सवित्लाच जीव असें, मन असें, चित्त असें, व बुद्धि असें झणतात. श्रीराम-गुरुवर्य, मन जड आहे की चेतन ? श्रीवसिष्ठ ते केवल जडही नाही व चेतनही नाही. तर उभयरूप आहे. कारण चितीलाच ससारदर्शत उपाधिमालिन्य आले असतां मन ह्मणतात. त्याचप्रमाणे त्याला सत् किंवा असतही ह्मणता येत नाही. प्रत्येक प्राण्यामध्ये तें भिन्न भिन्न आहे. हे चित्तच जगाचे कारण आहे. शाश्वत व निश्चित अशा एका रूपाने ज्याचें ज्ञान झालेले नाही अशा मात्म्याची अज्ञात सत्ताच चित्त आहे. चैतन्याचा औपाधिक बाय चलभाव मलिन असतो व आत साक्षिचैतन्यास आवरण नसल्यामुळे त्याचे आंतर स्वरूप कलंकरहित असते. तेंच मन होय. सारांश अशारीतीने त्याचे स्वरूप दोन प्रकारचे असल्यामुळे ते जडही नाही व चिन्मयी नाही. त्याचीच ही सर्व नावे आहेत. निरनिराळी कार्य करणान्या या मना- सच, निरनिराळी सोंगें घेणाऱ्या नटाप्रमाणे, भिन्न भिन्न नावें प्राप्त होतात. पाक करणे, पाठ करणे, मामाचा अधिकार चालविणे इत्यादि निरनिराळ्या अधिकारांमुळे एकाच मनुष्यास जसें पाचक, पाठक, प्रामणी (पाटील) इत्यादि मणतात त्याप्रमाणे भिन्न भिन्न कार्यामुळे एकाच मनास निरनि- राळी नावे प्राप्त होतात. राघवा, चित्ताच्या मी ज्या या संझा सांगितल्या माहेत त्यांसच निरनिरनिराळे वादी शेकडों कल्पना करून निरनिराळ्य ना देतात. मूळ प्रमाणाची अपेक्षा न करितां से मापाप तर्क छटाकून मन हे द्रव्य आहे, तें गणु माहे इत्यादि कल्पना करिवात कामना बुरि