पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृहयोगवासिष्ठसार. समर्थ असते. जेव्हां सवित् मिथ्याभूत देहादि ममिमानाने स्वतः आपल्या सचेची कल्पना करून “ अहं" अशी भावना करिते तेव्हां तिला अहंकार झणतात. ही भावनाच सर्व अनर्थाचे बीज व त्यामुळे भवबंधनी (संसारांत बांधून टाकणारी) आहे. पूर्वापर प्रतिसंधान सोडून ( मागचा पुढचा विचार न करितां) संवित् एका विषयाचा त्याग करून दुसऱ्याचे जेव्हा स्मरण करिते तेव्हा तिला चित्त हे नाव प्राप्त होते. काचा स्पंद हाच एक धर्म असल्यामुळे त्याच्या कडून तो असत् स्पंदच करवून त्याचे शरीर, अवयव इत्यादिकास दुसऱ्या स्थानी पोचविणे इत्यादि स्पंदफलास संपादन करण्याकरिता जेव्हा संवित् प्रवृत्त होते तेव्हा तिला कर्म ह्मणतात. अर्थात् शरीर, अवयव इत्यादिकांची संवित्-मुळे होणारी चेष्टा (व्यापार, हालचाल ) ह्मणजेच कर्म होय. एक व अद्वितीय अशा आपल्या स्वरूपास विसरून व त्या आपल्या स्वरूपाविषयींच्या निश्चयापासून ढळून संवित् जेव्हां इष्ट वस्तूची कल्पना करू लागते तेव्हा तिला कल्पना मणतात. पूर्वी या पदार्थाचा मला अनुभव आलेला आहे अथवा भालेला नाही अशा रीतीने जेव्हा संवित् निश्चय करिते, तेव्हा तिला स्मृति मणतात. इतर सर्व कार्ये सोडून अनुभूत पदार्थाच्या सूक्ष्म संस्काररूपाने जेव्हा संवित् रहाते तेव्हां तिला वासना ह्मणतात. आत्मतत्त्व अति विमल आहे. पण अविद्यारूपी कलंकामुळे प्रपचाची प्रतिभा (म. द्वैतदृष्टि) होते. तस्मात् प्रपं- चप्रतिभा त्रिकाली असत्य (अविद्यमान) आहे, असें ज्ञान झालें असतां पूर्वोक्त सवित् विद्या होते. आत्मतत्त्वास अगदी आच्छादित करून सोडणारी जी सं- वित्-ची ( आवरण ) मायाशक्ति तोच मल व आत्मतत्त्वाचे विस्मरण करून त्याचे भलतेच रूप दाखविणेंस कारण होणारी जी संवित्ची (विक्षेप) मायाशक्ति ती विस्मृति होय. ही मनोरूप संवित् ऐकून, स्पर्श बहन, पाहून, खावून, वास घेऊन व विचार करून जेव्हां जीवभावास प्राप्त झालेल्या परमेश्वरास आनंद देऊ लागते तेव्हा तिला इंद्रिय हे नांव प्राप्त होते. इंद्रास मणजे मात्म्यास भोगाच्या योगाने में सुख देतें तें इंद्रिय मसी या शब्दाची व्युत्पत्ति आहे, अज्ञात परमात्माच या सर्व दृस्य प्रर्फ पाचे उपादान व निमित्त कारण असल्यामुळे ला मनोमक्संविबूप देवास व्यवहार प्रकृति मणतात. सत्व असत्, यांतील एकाही पक्षात विचा साक्षात् तीन तापत नाही अशा अनिर्वचनीय मनोमय सषित- .