पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ९६. भनिश्चित सकल्प हेच मनाचे रूप आहे, सर्वदा चिद्रूपच असल्यामुळे सदा भासणाऱ्या आत्म्याविषयी " मी त्यास जाणत नाही" असा प्रत्यय वे जो कर्ता नव्हे, असा आत्मा कर्ता आहे, असा अनुभव ज्याच्या योगाने येतो ते मन होय. मन केव्हाही कल्पनामय कर्मशक्तीवाचून रहात नाही. ह्मणने या सृष्टीत कोणताही गुणी गुणावाचून असणे जसे शक्य नाही त्याप्रमाणे मन कर्मशक्तीवाचून असणे अशक्य आहे. अग्नि व उष्णता यांची भिन्न भिन्न सत्ता असणे जसे शक्य नाही त्याप्रमाणे कर्म व मन आणि मन व जीव याची पृथक्-सत्ता अशक्य आहे. केवल सकल्पस्वरूपी, व नाना- प्रकारे विस्तार पावणान्या मनानेच हे विस्तृत जग पसरले आहे. जग हे वासना-वृक्षाचे फळ आहे. कर्म हे त्याचे बीज, मन स्पंद हे शरीर, व विविध क्रिया ह्या शाखा आहेत, असे शास्त्रात वर्णन केले आहे व त्याप्रमाणेच अनुभवही येतो. व्यवहारात कमैद्रियाच्या व्यापारास कर्म, असे ह्मणतात हे खरे, पण वस्तुस्थिति कशी आहे, याचा विचार कर. मन ज्याचे अनुसधान करितें तेच सर्व कर्मेंद्रिय-वृत्ती संपादन करतात. आणि खरा प्रकार असा असल्यामुळेच कर्म व मन एक आहे, असे आह्मी ह्मणतो. राघवा, मन, बुद्धि, अहकार, चित्त, कर्म कल्पना, ससृति, वासना, विद्या, मल, स्मृति इदिये, प्रकृति, माया, किया इत्यादि सर्व शब्द व त्यावे अर्थ ब्रह्माचे ठायीं कल्पिलेले असून संसारभ्रम हाच त्याचा हेतु आहे. अकस्मात आपल्या स्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे जिची अपरिच्छिन्न दृगाकृति ( केवल चैतन्याकार) नाहीशी झाली आहे व त्यामुळे जी बाह्य ( ह्मणजे स्वेतर, जड ) वस्तूची कल्पना करण्यास (तद्रूप होण्यास ) तयार झाली आहे अशा चितीचे हे सर्व पर्यायशब्द आहेत. आता पर सवितचेच हे सर्व पर्याय शब्द कसे व ते कोणकोणत्या अर्थी रूढ झाले आहेत, ते सागतो. परा सवित् अविधेम जणुकाय कलंकयुक्त होत्साती केव्हा केव्हा विकास पावून " मी यशों माहे किंवा अशी नाही; " अशा विकल्परूपाने नाना होते. तेव्हा तिला मन असें मणतात. पण हा पहिला विकल्प झाल्यावर विशेष भावनेस प्रास होऊन पूर्वोक्त सत् व असत् या दोन कोटीतील एका कोटीत निश्चित होउन ती जेन्हा सुस्थिर होऊन रहाते तेव्हा त्याच संविदेस बुद्धि मों सजतात. ती " ही अशीच वस्तु आहे " असें स्थानमें जागफ्यास