पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२२ बृहद्योगवासिष्ठसार. नाहीसा झाला असता काजळपणा जसा नष्ट होतो त्याप्रमाणे स्पदरूप कर्म क्षीण झाले असता मनही क्षीण होत असते. यास्तव कर्म व मन यातील कोणा तरी एकाचा क्षय व्हावा असे ज्यास वाटत असेल त्याने प्राणनिरोधलक्षण हठयोगाचा किवा मनोनिरोधलक्षण राजयोगाचा अभ्यास करून प्राणाचा किवा मनाचा क्षय करावा. कर्मनाश झाला तरी मनोनाश होतो व मनोनाश हीच अकर्मता आहे. योगजन्य साक्षात्काराने अविद्येचा नाश झाला असता या दोघाचाही आत्यतिक नाश होतो त्याच्या पुनरुत्पत्तोस कारण होणाग बीजभावही न रहाणे, हाच आत्यतिक नाश होय. चित्त व कर्म ही दोन्हीं अग्नि व त्याची उष्णता याप्रमाणे एकमेकास अगदी चिकटून राहिलेली आहेत. त्यामुळे त्यातील एकाचा क्षय झाला असता इतराचाही क्षय होणे अगदी साहजिक आहे. तात्पर्य चित्तच विहित व प्रतिषिद्ध पुण्यपापात्मक अथवा धर्माधर्माकार होते व कर्मच फलभोगानुरूप होत्सातें स्पदरूप चित्त होते. येणेप्रमाणे एकमेकास निमित्त होऊनच चित्ताचे हे दोन स्पंद कर्म व धर्मसज्ञक झाले आहेत ९५. सर्ग ९६.-कर्मवैचित्र्यामुळे नाना प्रकारच्या आकारास प्राप्त झालेल्या मनाचे भेद व तत्त्व याचे येथे व्याख्यान करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, मन भावनामात्र आहे. भावना झणजे अनुभव घेतलेल्या पदार्थची कल्पना करणे. ती भावनाच स्पदधर्मिणी विहित व निषिद्ध किया होते. सूक्ष्मतेमुळे अदृष्टभावास प्राप्त झालेल्या क्रियेचे जे जन्मातरादि भाविरूप तेच तिचे फळ होय. प्रत्येक प्राणी त्याच्याच मागून जात असतो. (साराश मनच कर्मभावास व फळभावास प्राप्त होते.) श्रीराम-गुरुवर्य, जड असूनही जड नसल्यासारखे भासणारे हे मन सपजे आहे तरी काय ? त्याचे स्वरूप मला चांगल्या रीतीने समजेल असें सांमा. श्रीवसिष्ठ-अनत व सर्वशक्ति (मायाशबल ) अशा सर्वव्यापी आत्मत- त्वाचे, संकल्पशक्तीने प्रथम निर्माण केलेलें जें रूप तेंच मन होय. (मनुष्याच्या व्यवहारातही मन प्रसिद्धपणे अनुभवास येते; कसें तें पहा-) हा खांब आहे को पुरुष ! या विकल्पात सत्व असत् या दोन कोव्यांमध्ये जो भाव स्वीर न होता संचार करीत असतो खणजे हे अमुक आहे व अमुक नाही, असा स्थिर निश्चय ज्याच्या योगाने होत नाही तें मन होय. अणजे