पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग २३, २४, २५-या सात काल आणि त्याचे दैव, कृतात व नियति हे भेद याचे वर्ण केले आहे. मुनिराज यावरील अवस्थांचा शुद्ध चित्तानें व तात्त्विक दृष्टीने चागला वि- चार केला असतां शहाण्याच्या मनात त्या अवस्थाविषयी व जन्माविषयी वैराग्य उत्पन्न झाल्यावाचून रहात नाही. जन्म, मरण, जगातील पदार्थ व सुग्व- दुःखभोग हा सर्व भ्रम आहे. पण प्राण्याचे सकल्प, विकल्प व मनोरथ यान्या योगाने तो दीर्घायु व त्यामुळेच सत्य असल्यासारखा झाला आहे. मत्पुरुष मात्र त्याला चागले ओळखून आहेत. त्यामुळेच ते विषय व देह याच्या पाशात अडकून पडत नाहीत. याभ्रमास न ओळखणारे अज्ञ उपशात दिसणाऱ्या किवा चित्रात काढलेल्या फळाचा स्वाद घेऊ पहातात. पण त्याचा गुरु काल त्यास वठणीस आणित असतो. या सृष्टीत अशी एकही वस्तु नाहीं की, जी या कालाच्या पोटात उतरत नाही. हा महेश्वर सर्वास सारखाच भयं- कर वाटतो. हे जेवढे ह्मणून काही दिसत आहे, ते सर्व गठ करून टाक- ण्याकरिताच तो निर्माण झाला आहे. आजपर्यत अनत विश्वे त्याने पच- वून सोडली आहेत व यापुढेही तो अनत विश्वास पचविणार आहे. लहान, मोठे, शूर, भीरु, पुण्यशील, पापी, राजे, रक इत्यादि सर्व या मर्व भक्षकाचे भक्ष्य झाले आहेत व होत आहेत. वर्ष, युग, कल्प इत्यादि नावानी तो काहींसा प्रकट होतो, पण त्याचे रूप मुळीच अनुभवास येत नाही. तो सर्वास आपल्या वश करून घेतो. रम्य, शुभ व मेरू- सारख्या भारी वस्तूचाही तो घास घेतो. हा निर्दय, कठिण, क्रूर, तीक्ष्ण, कृपण व अधम काल एका मागून एक अशा क्रमाने किवा सास एकदम गिळून टाकितो; पण त्याची तृप्ति होत नाही. संहाराच्या कामाचा त्याला कधीं कटाळा येत नाही व तो त्यामुळे कधीं थकत नाही. यास नाहीसे करावे, असे कोणी मनात आणिल्यास तो अच्छेद्य व अदाह्य आहे. एका क्षणात एकाद्या वस्तूची उन्नति करून लागलाच नाश कसा करावा, याचे त्यास काहीच वाटत नाही. तो प्रत्येक पदार्थाचा परिणाम करीत राहिला आहे. सृष्टीतील सर्व करता, लोभ, दुर्भाग्य, व चाचल्य त्याच्यामध्ये भरले आहे. हा महा कृपण काळ गवताची कार्ड व धुळीचा कणही सोडील नाही. सूर्य, चद्र इत्यादि ज्योतीस हा लीले

- तीन ग्टानो आमरिया त्यानें अगण आहे, असे सम