पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९५. ४२१ तुज भीति पडली होती ती व्यर्थ आहे. कारण कोणतेही आकाश, कोणताही लोक. कोणताही पर्वत, कोणताही समुद्र व या सृष्टीतील कोण- ताही पदार्थ मनावाचून नाही. प्रत्येक वस्तु मनाचे कार्य आहे व तेंच कर्माचे फलही आहे. सावधान चित्चाने केलेले साग कर्म हाच पौष प्रयत्न होय व तो केव्हाही निष्फल होत नाही. या सर्व विवेचनाचा सारांश असा-भविधेपासून उत्पन्न झालेले मनच क्रियाशक्तियुक्त अस- ल्यामुळे व चिदात्म्याची उपाधि असल्यामुळे कर्ता व भोक्ता आहे. आता प्रत्येक कल्पामध्ये व प्रतिदिवशी ते जरी उत्पन्न होऊन लीन होत असले तरी प्रत्येक दिवशी सूर्योदयानंतर व्यक्त होऊन सूर्यास्तानंतर नष्ट होणान्या भिंतीच्या छायेप्रमाणे अथवा आरसा पुढे धरिला असता त्यांत व्यक्त होऊन तो दूर केला असतां नष्ट होणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे तेच तें पुनः पुनः उपाधीबरोबर व्यक्त होऊन तिच्याबरोबर लीन होते. कालचे तेंच हे माझे मन आहे, अशी मनुष्यमात्रास येणारी अबाधित प्रतीतीही तें एकच आहे, या आमच्या ह्मणण्यास पुष्टि देते. प्रत्यही किंवा कल्पाती होणारा नाश मणजे शून्यता नव्हे व उत्पत्ति ह्मणजे पूर्वी मुळीच नसलेल्या वस्तूचा उद्भव नव्हे. तर सत् वस्तूचाच, काही निमित्त मिळाले असता, विशेष- प्रकारें आविर्भाव होणे झणजे उत्पत्ति व निमित्ताभावी तिचे ते विशेषरूप क्षीण होणे झणजेच नाश, असे आमचे झणणे आहे. त्यामुळे प्रत्येक सुषुप्तीच्या वेळी मन नाश पावते, असे सटल्याने प्रत्येक दिवशीचे मन निरनिराळे असते असे समजण्याचे काही कारण नाही. कार्य उत्पत्तीच्या पूर्वीही कारणरूपानें सत्च असते.या सत्कार्यवादाचा आमीं अंगीकार केलेला असल्यामुळे अविद्याबीजरूपाने विद्यमान असलेल्या कर्त्याची, कर्माची व कर्मफलरूप आकाशादि प्रपचाची एकाच समयी उत्पत्ति होते, असे मानिलें तरी कृतहान व अकृत-अभ्यागम प्रसंग येत नाही; शास्त्राचा बाध होण्याचा प्रसंग येत नाही; मनुष्यमात्र पशुवृत्ति होण्याचाही अनिष्ट प्रसंग येत नाही आणि जन्म व कर्म यांच्या व्याप्तीचाही भंग होत नाही. व्यक्त व अव्यक्त अवस्थेत असणारे मनच अविद्या माहे, असाही भामचा सिद्धांत असल्यामुळे आत्मविस्मरण हेच एक प्रपंच-कारप माहे, मसें झणणेही उचितच होय.. आता कर्ता व कर्म यांची सहोत्पची मान- व्यापासून फल कोणते मिळतें मणन सणाल तर सांगतो. काळेपणा