पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० बृहद्योगवासिष्ठसार. यांच्या स्वाभाविक प्रवृत्तीच्या विरुद्ध त्याचे नियमन करून, व्यर्थ सदाचरण करण्याचे कोणीही मान्य करणार नाही. त्यामुळे शहाण्या मानवाचीही पशुवृत्ति अनावर होईल. बलाढ्याने दुर्बलाला नाहीसे करून आपलें पोट भरावयाचे, हा पशूचा न्याय प्राणीमात्राची नीति होऊन बसेल. यास्तव, अहो ब्राह्मणश्रेष्ठ, आपण मजवर दया करून कृत कर्माचे फल मिळतें की नाही, ते मला खरे सांगा. श्रीवसिष्ठ-राघवा, तू मला हा फार चांगला प्रश्न केला आहेस. त्याचे उत्तर ऐकिल्याने तुला उत्तम ज्ञान होईल. कर्म व कर्ता यांची एकाच काली उत्पत्ति होते, असें झटल्यानेही तू सागितलेल्या वरील लौकिक समजुतीशी विरोध येत नाही. कारण “जीव मनाने ज्याचें ध्यान करितो तेंच तोडाने बोलतो व हाताने करितो," अशा अर्थाचे श्रुति- वचन आहे. यास्तव मनाचा क्रियानुसधानरूप विकास हेच कर्माचे बीज आहे. कर्म ह्मणजे देहाची चेष्टा. देहाचा व्यापार, पहिल्या सगी(सृष्टी)त जेव्हा परब्रह्मापासून मन उत्पन्न झाले तेव्हाच त्या त्या उपाधीमध्ये व्यक्त झा- लेल्या समष्टि व व्यष्टि जीवाचें कर्मही उद्भवले आहे. पुष्प व वास याच्या प्रमाणेच मन व कर्ता याच्यामध्ये भेद नाही. जीव प्राक्तन वासनेप्रमाणे देहच मी आहे, अशा देहाहंकाराने राहतो. यास्तव मनच कर्ता आहे. (आत्मा नव्हे.) व कर्मही मनच आहे. कारण त्याच्या प्रेरणेवांचून देहाची कोणतीही चेष्टा होत नसते. ह्मणून मी-कर्ता व मन-याची उत्पत्ति एकाच काली होते, असे सटलें आहे. जीवभाव व कर्मभाव हे दोन्ही मनाचे धर्म आहेत. आत्म्याचे नव्हेत, हे सागण्याचा माझा त्यांत उद्देश आहे. कर्म व त्याचे सस्कार यांच्या रूपाने मनात स्थित असलेली क्रियाच अदृष्ट होय व ती( क्रिया )च फलरूपाने आविर्भूत झाली असतां देह, स्वर्ग, नरक इत्यादिरूप होते. एवं च कर्माचा वास्तविक आश्रय जरी देह असला तरी त्याचें पूर्व निमित्त मन आहे. पुढे प्राप्त होणाऱ्या देहाच्या आका- रावर जेव्हां मन अभिमान ठेवितें तेव्हा ते पूर्वदेह सोडून जाते व पूर्व देह सोडतांना त्याने ज्याचा अभिमान धरिलेला असतो तोच देह त्यास नियमानें प्राप्त होतो. एवण्यासाठीच पूर्वी मी "आतिवाहिक देहच वासना- बलाने स्थूलभावास प्राप्त होतो" असे प्रतिपादन केले आहे. अर्थात् कर्मे व कर्ता यांची सहोत्पति मानल्यास कर्म निष्फल होण्याचा प्रसंग येईल, अशी जी