पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ९५. ४१९ श्रीराम-गुरुराज, अलौकिक धर्म व ब्रह्म याविषयी मुख्य प्रमाण श्रुति ( वेद ) आहे. तिच्यापासून ज्याना ज्ञानदृष्टि प्राप्त झाली आहे त्यास प्रामाणिक दृष्टि असें ह्मणतात. अशा निष्काम प्रामाणिक-दृष्टी पुरुषानी निर्णय करून सागितलेला जो धर्म तेच शास्त्र होय. मनु, जैमिनी इत्यादि पुरुषाच्या वचनाम शास्त्र ह्मणण्याचे हेच कारण आहे. (साराश, श्रुति व श्रुतिमूलक स्मृति हीच अलौकिक अर्थाविषयी प्रमाणे आहेत.) त्याचप्रमाणे सदाचार हेही आणखी एक प्रमाण आहे. कारण ज्याचे आचरण प्रमाण मानावयाचे ते सत अत्यत शुद्ध, मत्वगणयुक्त, दुःखद विषयाच्या योगाने कपायमान न होणारे, समदृष्टि, रागद्वेषशून्य व शब्दानी वर्णन न करिता येणाऱ्या ब्रह्माच्या साक्षात्काराने मपन्न असतात. तस्मात् ज्याना तत्त्वार्थ ज्ञात झालेला नसतो अशा शिष्टाना, वम व ब्रह्म याचे तत्त्व समजण्यास श्रुतिस्मृतिरूप शास्त्र व सदाचार हेच दोन मार्ग आहेत. अथवा हेच दोन न्याचे नेत्र आहेत. पण त्याचा आश्रय करून जर पाहिले तर कर्म व कर्ता याच्या मध्ये हेतुफलभाव आहे, असे दिसते. ज्याच्यामध्ये हेतुफलभाव असतो ते पदार्थ एकाच काली सिद्ध होणारे नसतात. जमे बीज व अकुर. त्याचप्रमाणे कर्माच्या योगाने कर्ता सिद्ध होतो व कर्त्यांच्या हातून कर्म घडते. हणजे बीजापासून जसा नवा अकुर उद्भवतो त्याप्रमाणे कर्मापासून जतु उत्पन्न होतो व त्या भंकुरापासून पुनः जसें बीज उद्भवते त्याप्रमाणे त्याच्यापासून कर्म होते. ज्या वासनेच्या योगाने प्राणी भवसागरात पडतो तिच्या अनुरूपच त्याला फल भोगावे लागते. पण असे असताना, प्रभो, आपण जन्मबीजभूत कर्मावाचूनच ब्रह्मपदापासून भूतांची उत्पत्ति होते असे कसे झणता ? कारण कर्ता व कर्म याची एकाच काली उत्पत्ति होते, असें झणून आपण जगात रूढ झालेलें व अव्यभिचारी असे त्यांचे परस्पर कार्यकारणत्व तुच्छ करून सोडले आहे. हिरण्यगर्भादि स्थूल-सूक्ष्म-उपाधि हीच कर्माची फले आहेत व कोणतेही कर्म निष्फळ नाही. तर प्रत्येक बरे-वाईट कर्म आपलें योग्य फल अवश्य देतेच. या मनुष्यमात्राच्या दोन कल्पना आपल्या या झणण्याने पार नाहीशा झाल्या भाहेत. शिवाय कर्माचे फलच नाही, असे सटलें की नरकादिकांचे मपर पाहिले नाही. तेव्हा मुद्दाम शरीर, इद्रिय व मन या सर्वास त्रास देऊन"