पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१८ बृहद्योगवासिष्ठसार. पानाप्रमाणेच एकसारखे उत्पन्न होत असतात. साराश, हे राघवा, पुष्प व त्याचा सुवास हे जसे एकाच काली व एकरूपाने उद्भवतात त्याप्रमाणे पुरुष व त्याचे जन्मास कारण होणारे कर्म ही दोन्ही एका परेशापासून एकाच काली व अभिन्नरूपाने उद्भवून हळु हळु त्यातच लीन होतात. एकाच काली उत्पन्न होण्याची कल्पना प्रत्यक्षप्रमाण-सिद्धही आहे. कारण वस्तुत. असिद्ध असे हे दैत्य, उरग, नर, देव इत्यादि प्राणी केवल वासना व भूतें या उपाधींनी वारवार उत्पन्न होतात व ज्या भूतसमूहात उत्पन्न होतात त्यास ' हा मी' असे समजतात. पण त्याचे कारण काय ? पूर्व कमें त्याचे कारण आहे ह्मणून ह्मणावे तर पूर्व कांवाचून ती होणे व असणे शक्य नाही. उत्पत्तीपूर्वी हाच संघात पूर्व कर्माचा कर्ता होता, असेही ह्मणता येत नाही. तेव्हा प्राण्याच्या या अव्याहत विहाराचे कारण आत्म्याला विसरणे यावाचून आणखी काही दिसत नाही. आत्मविस्मरणच जन्मांतर फल देत असते. (या सर्व विवेचनाचा गूढार्थ असा-कर्ता अनादि आहे, असें ह्मणता येत नाही. कारण कर्तृत्व हा जीवाचा स्वाभाविक धर्म आहे, असे मानि- ल्यास अग्नीच्या स्वाभाविक उष्णतेप्रमाणे सहस्र उपायांनीही त्याचा परिहार होणार नाही व त्याचा परिहार झाला नाही ह्मणजे जीवास मोक्ष मिळ- ण्याचीही आशा करावयास नको. बरे कर्तृत्व औपाधिक आहे, असे ह्मणावे, तर उपाधि कोणती? अविद्याच की दुसरी एकादी ? अविद्या हीच कर्तृत्वाची उपाधि असून तिच्यामुळेच आत्म्याचे ठायीं औपाधिक कर्तृत्व येते असे हटले की, आमचा पक्ष सिद्ध झाला. पण अविद्याही स्वतत्रपणें-हणजे दुसऱ्या कोणाची अपेक्षा न करितां-तें उत्पन्न करूं शकत नाही. कारण निद्रा, मूर्छा इत्यादि प्रसगी कर्तृत्व नसते. यास्तव तिलाही दुसऱ्या कोणाचें सहाय लागतेच. बरें अविद्येहून दुसरेच काही कर्तृत्वाचे कारण आहे, असें झणावें; तर त्यावर दोष येतात. करिता आत्मा जरी अनादी आहे तरी त्याच्याशी कपाधीचा प्रतिकल्पी व प्रति- दिनी होणारा संबंध निरनिराळा असल्यामुळे त्या सबंधाच्या अधीन असलेल्या कर्तृस्वरूपाची कर्माबरोबरच उत्पत्ति होते व तें स्वरूप कर्म- शक्तियुक्त उपाधीशी तादात्म्य पावतें. तस्मात् आत्मविस्मरण हेच कर्तृत्वा- दिकांचे बीज आहे).