पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पधिप्रकरण-सर्ग ९५. भाभी स्वभाववशात् ती. दोन्ही प्रकट झाली आहेत. ( एवढ्याचसाठी स्वतः भगवानांनीही " तो प्रभु, कर्तृत्व, कमें व कर्मफलसंयोग यांतील काही उत्पन्न करीत नाही. तर केवळ स्वभाव प्रवृत्त होत असतो, असें झटलें आहे.) विस्तृत आकाशांत अज्ञदृष्टया जसा नीलवर्ण अनुभवास येतो त्याप्रमाणे निर्मल ब्रह्मामध्ये जीवांचा भास होतो. अर्थात् त्यांच्या आविर्भावास व तादात्म्य-अध्यासास स्वभावनामक जीवांचे अज्ञानच कारण होते. यास्तव सृष्टीविषयी जे काही बोलावयाचे असतें तें अज्ञांस संमत असलेल्या व्यवहारभूमीतच योग्य असते. कारण परमावस्थेत सृष्टिवादास मुळींच अवकाश मिळत नाही आणि त्यामुळेच ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने " हे अमुक ब्रह्मापासून झाले आहे किंवा हे झाले नाही" असें ह्मणणे अगदीं शोभत नाही. राघवा, द्वैताची कल्पना केल्या- वाचून उपदेश्य-उपदेशकभाव सभवत नाही. हे तुला माहीत आहेच. कारण हा उपदेश्य (उपदेश करण्यास योग्य) व मी उपदेशक असें झटले की द्वैतकल्पना झालीच. यास्तव भेददृष्टीने या व्यवहारकाली शोचनीय द्वैतकल्पनेचा अगीकार करूनच शास्त्रास हे ब्रह्म, हे त्याच्यापासून अशा अशा क्रमाने झालेले जीव इत्यादि प्रकारे उपदेश करावा लागतो. व्यव- वहारातही अशाप्रकारचा अभ्युपगम्यवाद पुष्कळदा स्वीकारितात. (वस्तु- स्थिति तशी नसताना विचाराकरिता एकादी कल्पना करणे, यासचं अभ्युपगम्यवाद ह्मणतात. उदाहरण-समजा की, रामा हा कृष्णाचा भाऊ आहे व त्यास कोणी पीडा दिली, इत्यादि.) पण उपदेशाकरितां द्वैताचा आरोप केल्यावर त्याचा अपवाद करावा लागतो. तो कसा अणून मणशील तर सांगतो.हे जग असग ब्रह्मापासून झालें आहे.ब्रह्म हेच त्याचे उपादान कारण आहे व त्यामुळे तें ब्रह्मरूप आहे. उत्पत्तीपूर्वीही तें ब्रह्मच होते व नंतरही ब्रममयच आहे. पण भ्रातिज्ञानामुळे ते त्याच्याहून भिन्न आहे, असे वाटते. मेरु-मंदारासारिख्या अनेक जीवराशी वारवार उत्पन्न होऊन त्याच परम पदी पुनः पुनः लीन होतात (येथे जीव-शब्दाने त्यांच्या उपाधी घ्याव्या ) वसंत ऋतूंत वनस्पतींस जशी पालवी फुटते त्याप्रमाणे सृष्टिसमयीं मायाशक्तियक्त ब्रह्मापासून जीवाकुर उगवतात व प्रीष्म-ऋतूंत, वसतरस जसे त्या त्या औषधि, वनस्पतीतच जिरून जातात त्याप्रमाणे प्रलयकाली ते सर्व त्यांतच डीज होतात. स्थितिकालीही तेच ते किंवा आणखी नवीनही जीव द्वारा