पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ बृहयोगवासिष्ठसा तामस योनीत जन्म घेऊन प्रहाद, कर्कटी इत्यादिकांसारखे जे प्राणी मोक्षास योग्य होतात त्याच्या त्या जन्मास तामससत्त्वा जीवजाति बसें मुज्ञ झणतात. मागें भनेक जन्म अनुभवून पुढेही अनेक जन्म ब्याक्यास लागणारी जी जाति ती तमोराजसी होय. पण तिचा अतर्भाव वर सागि- तलेल्या राजसतामसीत होतो. मागील व पुढील लक्षावधि जन्मांनी युक्त असून जिच्यामध्ये मोक्षाविषयीं सदेह असतो ती अत्यंत तामसी होय. तिचा, प्रकारांतराने, वर निर्देश केलाच आहे. एकून या सर्व बारा जाति भाहेत. त्या उपाधिद्वारा ब्रह्मापासून उद्भवतात. कारण वायूनें चलायमान केलेल्या जलराशीतून जशा लाटा उठतात दीपज्योतीपासून जसे किरण पसरतात, देदीप्यमान अमीपासून जशा ठिणग्या उडतात, चंद्रापासून जसे शीताशु निघतात, वृक्षाच्या मुख्य स्कधापासून जशा अनेक लहान मोठ्या शाखा व प्रशाखा उद्भवतात, सुवर्णापासून जसे कटकादि आकार उत्पन्न होतात त्याप्रमाणे सर्व जीवराशी ब्रह्मापासून उत्पन होतात, असे मागे मी सागितलेच आहे. आणग्वीही असे अनेक दृष्टांत देता येण्यासारखे आहेत. पण उगीच चर्वितचर्वण करण्यांत काय अर्थ आह ! तूं इतकेंच लक्षात ठेव की ब्रह्म अशी असून जीव त्याचे कल्पित अश आहेत अर्थात त्याचे पारमार्थिक ऐक्य होणे शक्य आहे. प्राण्याच्या शरीरादि उपाधि मिथ्या आहेत. कारण त्या अज ब्रह्माचे ठायीं कल्पित आहेत. त्यामुळे त्याचाही अधिष्ठान ब्रह्माशी अभेद आहे. या सर्व जाती ब्रह्मापा- सूनच उद्भवतात व त्यातच लीन होतात. त्यातील कित्येक एकेकाच जन्ममरणाचा अनुभव घेऊन आपल्या परम कारणात लीन होतात; कित्येकीस दहा-वीस, पाच-पंचवीस, हजार-पाचशे, जन्म घ्यावे लागतात वकित्येक जातीस तर एक कल्पभर अथवा अनेक कल्प जन्म-मरणपरंपरेत भ्रमण करावे लागते ९४. सर्ग९५-या सगत-सुस्थिति तशी नसतानाही, अज्ञ जनान्या बोधाकरिता वर्म व की या दोघाचीही उत्पत्ति परब्रह्मापासून होत, असें ममर्थन रतात. श्रीवसिष्ठ--रामचद्रा, वृक्षापासून पुष्प व सुवास याची जशी एकाच केळी उत्पत्ति होते त्याप्रमाणे कर्म व कर्ता याची उत्पत्ति परम पदापासून एकाच काळी झाली आहे. त्याचे वस्तुतः ऐक्य असून सर्गाच्या