पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ वृहद्योगवासिष्ठसार. पिछक्ति प्रथम समाधि प्रम-जीरूपाने व्यक्त होऊन पुढे तीच व्यष्टिः अहंकाराने मर्यादित होउन व्यष्टि जीव बनते. अशी अनंत जीवतत्वे या ब्रह्मांडांतील चतुर्दश लोकांत वापरत असतात. त्यांचे कर्मानुरूप ऊ किंवा अधोगमन होत असते. त्यांतील प्रत्येकाची भिन्न भिन्न क्रिया चालू असते. त्यांतील कित्येक दुराचारी असतात, कित्येक शुभ कर्मे करितात, काहीं मुक्त होऊन तत्त्वामध्ये मिळून जाण्याच्या तयारीस लागतात, कित्येक मिळून जातात, काही पापाच्या प्राबल्यामुळे च्युत होऊन अधोमार्गास लाग- तात व कित्येक पुण्याच्या सामर्थ्याने ऊर्ध्वगामी होतात. सारांश सर्व जीवांची उत्पत्ति ब्रह्मापासून झाली आहे. उत्पत्ति व नाश यांच्या द्वारा त्यांचे नियमन होत असते.वासनारूपी विषामुळे त्यास नानाप्रकारच्या यातना सोसाव्या लागतात. हे सद्गुणी रामा, अशा प्रकारची ही जगत्संज्ञक जगलांतील जीर्ण वल्ली आहे. तिला तत्त्वसाक्षात्काररूपी कुठारीने तोडून टाकिली असता ती मन, शरीर इत्यादि रूपाने पुनः वाढत नाहीं ९३. सर्ग ९४-या सर्गात भिन्न भिन्न उपाधींमुळे जीवांचे बारा प्रकार होतात व त्यांतील कित्येक सत्वर मुक्त होणारे असतात व कित्येक दीर्घ कालाने मुक्त होतात, असें वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-सात्त्विक, तामस व राजस भेदामुळे चवदा भुवनात इतस्ततः उत्पन्न होणाऱ्या जीवाच्या ज्या उत्तम, अधम व मध्यम उपाधी आहेत त्यांचा विभाग मी आतां तुला सांगतो. इदप्रथमता हा त्यांतील पहिला भेद होय. असे समज की, एक जीव पूर्व कल्पांतील शेवटच्या जन्मी शम-दमादि सर्व साधनगुणसंपन्न होता. पण त्यास श्रवणादिकांचा लाभ न झाल्यामुळे किंवा दुसऱ्या एकाद्या प्रबल प्रतिबंधामुळे ज्ञान झाले नाही. पण तो आता या कल्पांतील पहिल्याच जन्मीं शमादि-गुणसपन्न व ज्ञानयोग्य होऊनच उत्पन्न झाला, तर त्याची ती जीवजाति (जन्म) इदंप्रथमता नामक होय. कारण ती पूर्वकल्पातील शुभ अभ्यासामुळे रद्भवलेली असते. अशा जीवास न्याच जन्मी मुक्ति मिळणार, हे निर्विवाद आहे. पण तीच त्याची जीवजाति पूर्वकल्पांतील वैराग्यमांद्यामुळे, शुभ लोकाची इच्छा राहिलेली असून, तदर्थ केलेल्या उपासनेने युक्त असल्यास गुणपीवरी या नावाची दुसरी उपाधि होते. कारण पूर्वकल्पां- तील शेवटच्या जन्मी त्यास पूर्ण वैराग्य झालेले नसल्यास झणजे तें मंद