पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरण-सर्व ९३. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, याप्रमाणे ब्रह्मदेवानें पूर्वी मला सांगितलेले वामात मी तुला निवेदन केलें. ज्याचें नाम व रूप व्यक्त नाही अशा ब्रह्मापासून सूक्ष्म असल्यामुळे, नामसबधशून्य, सर्व प्रपचरूप, चलनात्मक व निवि- कल्प ज्ञानाने प्रकाशित असे एक तत्व होऊन तेंच पुढे धन झाले असता स्वतः मन होते. ते तन्मात्राची झणजे सूक्ष्म भूताची कल्पना करून, स्वप्नांतील शरीराप्रमाणे, वासनामय पुरुषाकार होते.त्या उपाधीने युक्त असलेला आत्मा तैजस पुरुष होतो. कारण तेज ज्यांत मुख्य आहे अशी लिंग-समष्टिच त्याची उपाधि असते. तो आपले नाव 'ब्रह्मा' असें ठेवितो. साराश हे रामा, ज्यास परमेष्ठी ह्मणून ह्मणतात ते हे मनस्तत्त्वच होय. त्यामुळे तो संकल्प- मय ब्रह्मा जी जी कल्पना करितो ती ती तत्काल फलद्रूप झाली आहे, असे पहातो. त्यानेच ह्या अविद्येची कल्पना केली आहे. अनात्म वस्तुच्या ठायी, हा आत्मा आहे, असा अभिमान धरणे हेच त्या अविद्येचे स्वरूप आहे. __ असो; पुढे त्या ब्रह्मदेवाने याच क्रमानें जगत्कल्पना केली. परतु वस्तुस्थिति अशी असताना झणजे ब्रह्मतत्त्वापासूनच हे सर्व झाललें अस- तांना ते दुसऱ्याच कोणापासून ह्मणजे जड प्रधानापासून, परमाणूंपासून, शून्यापासून, विज्ञानापासून झाले आहे, असें कि येक हणतात पण एकेका वस्तूची परमाणुरूप अनेक उपादान कारणे आहेत, अशी कल्पना कर- ण्यांत गौरव हा दोष येत असल्यामुळे नैयायिकाचा परमाणु कारण-वाद प्राह्य नाही. सचेतन कावाचून जड प्रधानाम विचित्र जग रवता येणे शक्य नाही व पुरुष तर असग व उदासीन असल्यामुळे कर्ता होऊ शकत नाही. अशी अडचण येत असल्यामुळे साख्याचा प्रधान-कारण- वादही अयुक्त आहे. विज्ञानाने जडाकार परिणत हाणे अयाग्य आहे. यास्तव विज्ञानवादी बौद्धाच्या विज्ञानापासून हे सर्व होते, असे सम- जणे प्रशस्त नाहीं शून्य कधीही कोणाचे कारण झालेले ऐकिवांतही नसल्यामुळे शून्यवादही त्याज्य आहे. शिवाय या सर्व वरील वादांस काही प्रमाण नसल्याकारणानेही ते अग्राह्य ठरतात. आता बाकी राहिलेल्या विवर्तवादाविषयी जर पाहिले तर त्याला श्रुतीचे प्रमाण आहे. शिवाय त्यात लाघव गुण आहे. यास्तव अनिर्वचनीय मायाशक्तियुक्त ब्रह्माचा प्रपंच हा विवर्त आहे, असे समजणेच युक्त हाय. असो; येणेप्रमाणे ब्रह्मच विवर्तरूपाने जग होऊन तेच जीवरूप झाले आहे. कारण ब्रह्माची