पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. केवढा असेल त्याचा तू विचार कर. दृढनिश्चयरूप प्रयत्नानें भापले मन विरक्त व ज्वररहित करून शूलावर चढलेल्या मांडव्याने केश सहन केले (ही कथा महाभारतांत आहे). दीर्घतपा ह्मणून एक मुनि होता. त्याला आपण यज्ञ करावा अशी इच्छा झाली व त्याकरितां तो सामग्री आणावयास गेला. पण दैवयोगाने मार्ग चुकून तो एका अति खोल कूपात पडला. तेव्हा यज्ञाचा काल निघून जातो असे पाहून त्याने मनानेच तेथें तो (पत्र) केला. त्यामुळे इद्र प्रसन होऊन तेथे आला व त्यास कूपातून वर काढून स्वस्थानी घेऊन गेला. अशी एक दीर्घतपामुनीची कथा सागतात. इदु- पुत्र निश्चयरूपी पौरुषानेच ब्रह्मदेव कसे झाले, ते आताच सागितले आहे. असेच आणखीं अनेक देव व मुनी सावधान राहून आपल्या चित्ताचे अनुसधान थोडे सुद्धा सोडीत नाहीत व दृढ अनुसधानाने युक्त असलेल्या चित्तास आधि, व्याधि, शाप व पाप-दृष्टि काही करू शकत नाहीत. आता नहु- पादि काही लोकास शापादिकाचे फल भोगावे लागले व अद्यापि कित्येकांस लागते हे खरे, पण केवळ शाप हेच त्याचे कारण नसून प्रतिकुल कमें अथवा शुभ अनुसधानाचा अभाव ही त्याची कारणे आहेत. कारण जो कोणी या संसारांत सावधान मनाने शुभ निश्चय व शुभ विवेक करीत रहातो त्यास स्वमातही अनिष्ट फल भोगावे लागत नाही. ही प्रत्येकाच्या भनुभवास येणारी गोष्ट आहे. यास्तव ज्यास आपल्या परम कल्याणाची इच्छा असेल त्याने आपले चित्त पवित्र मार्गाकडे लावावे. अनुसंधान हे परम साधन आहे व त्याच्याप्रमाणेच चित्त सदा पुष्ट होत असते. चिंत- नाप्रमाणे भापण स्वत होणे हा त्या मनाचा स्वभावच आहे. त्याच्या संक- स्पाप्रमाणे साला सर्व जग दिसते. सकल्पामुळे त्याला खारट किंवा मधुर वस्तु अम्तासारग्वी गोड लागते. ते आपल्या कल्पनाशक्तीने आकाशांतही महा भरण्य बनवू शकते. ते कल्पनेनेच त्याचा विध्वंस करि- ते व कल्पनेनेच त्याचा पुनरपि आरोप करिते. तात्पर्य मन या सर्व इंद्रजालाची कल्पना करितें व कल्पनेप्रमाणेच ते सर्व पहाते. यास्तव जग सत् नाही व असतही नाही, असे समजून तूं ही भेददृष्टि टाक ९२. सर्प.९३ ब्रापासून प्रथम मन झाले, त्याच्यापासून तैजस पुरुष (हिरण्यगर्भ, मा) काय्यापासून महंचार व महंबरापासून विश्व, भसे या वर्गात