पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरण-सर्ग २२. पदार्थ, या दृष्टीने तिची निदा केलेली आहे. अर्थात् स्त्रियाच्या दृष्टीने उलट पाहू लागल्यास पुरुषाची अशीच निदा होणे शक्य व योग्य आहे. पण पुरुष जितक्या लवकर विषयासक्त होतो तितक्या लवकर स्त्री होत नाही, हे स्वभाववैचित्र्यही ध्यानात ठेवण्यासारिखे आहे असो, ] अशा या स्त्रीच्या ठायीं मुळीच आसक्त न होता मी आपला उद्धार करून घेण्याचा निश्चय केला आहे २१. सर्ग २२- शोक, मोह, इष्टवियोग, क्लेश, विषाद व रोग यानी व्याप्त असलेल्या वृद्धावस्थेची येथे निंदा केली आहे पण तरुण स्त्री इत्यादि पदार्थाचे ठायी दोषदृष्टि न ठेवता जे त्याचा उपभोगाकडे उपयोग करितात व आपल्या तारुण्याचा दुरुप- योग करितात त्यास थोड्याच कालात जरा म्हणजे वृद्धावस्था येते ( तारुण्याचा सदुपयोग करणाऱ्या व विषयोपभोगाने शरीर क्षीण न कर- णाऱ्या पुरुषास व स्त्रियासही जरा येत नाही, असे नाही. जराहा देह- धर्म आहे. यास्तव काही अल्पायु प्राण्यास सोडून बाकी सर्वास तिचा अनुभव घ्यावा लागतोच. पण दुराचरणी व विषयी लोकान्या जरेचा काल व परिणाम सदाचरणी लोकान्या जरेन्या कालाहून व परिणामाहून भिन्न असतो. बाकी कोणतीही व कोणाचीही वृद्धावस्था क्लेशकारक असते, या विषयी मतभेद होणे शक्य नाही.) ही अवस्था देहास जर्जर, कुरूप, अशक्त व परतत्र करून सोडते. तरुण स्त्रिया वृद्ध पुरुषाकडे मोठ्या तिरस्काराने पहातात. त्याना तो पाठीस पोक आलेल्या उटासारिखा भासतो. म्हाताऱ्याची बुद्धि नाहीशी होते. वार्धक्यामुळे कापू लागलेल्या जीर्ण देहाकडे पाहून त्याचेच दास, पुत्र, स्त्रिया, आप्त व बाधव त्यास हसू लागतात. वृद्ध प्राणी एकाद्या दीनासारिखा निःसहाय होतो. त्याची इच्छा मात्र वाढत असते. आता काय करावे ? परलोक कसा साधेल ! अरेरे, इतके आयुष्य व्यर्थ गेले, काही पुण्यसाधन केले नाही, पापाचे मात्र ढीग घातले; आता माझे कसे होईल ! यमराजाचे दूत माझे हाल करतील, इत्यादि विचार व भीति ह्यांचा त्याच्या मनात प्रादुर्भाव होतो. असामर्थ्यामुळे प्रत्यही वाढणारे राग तर त्याच्या शरीरास आंतून तोडित असतात. खरोखर तारुण्यातील सर्व सामर्थ्यास व उत्साहास नामशेष करून टाकणारी ही जरा शत्रूसही प्राप्त होऊ नये २२.